Mahayuti Vs MVA: कोल्हापुरात वारं फिरणार? युती अन् आघाडीला कुठे कुठे बसणार फटका?

Kolhapur Politics News : राज्यातील बदलेल्या सत्ता समीकरणानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात भाजप आणि काँग्रेसच्या हक्काच्या जागांवरून वाद सुरु झाला आहे.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVASarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत ज्या पक्षाने जी जागा जिंकली, त्याच पक्षाला ती जागा दिली जाईल, असे सर्वसाधारण सूत्र दोन्ही आघाडीत निश्‍चित झाले आहे. तरीही महायुती आणि महाविकास आघाडीत असलेले पक्ष आणि प्रत्येक पक्षातून असणारे इच्छुक यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ जागेवरून स्पर्धा सुरू आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि महायुतीत जागा कोणाला जाणार, यावरूनच अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत हा तिढा होणार असून, त्यातून उमेदवारासाठीच घमासान होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महायुतीला हादरा आणि महाविकास आघाडीला फुटीरवाद्याचा धोका अधिक गडद झाला आहे.

राज्यातील बदलेल्या सत्ता समीकरणानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात भाजप आणि काँग्रेसच्या हक्काच्या जागांवरून वाद सुरु झाला आहे. जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण, करवीर, शाहूवाडी व कागल विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातील, आणि उमेदवार कोण असतील हे जवळपास निश्‍चित आहे.

पण जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. आपापसात सुरू असलेल्या तिढ्यामुळे ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे पुढे अद्याप सुटलेलं नाही. इचलकरंजी, राधानगरी, चंदगड, हातकणंगले व शिरोळच्या जागेवर महाविकास आणि महायुतीतही जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे.

Mahayuti Vs MVA
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारच्या वतीने भाजप नेत्याने मागितली जाहीर माफी

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आमदार डॉ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने शाहूवाडीसह करवीर, चंदगड, व हातकणंगले मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. करवीर मतदारसंघातून त्यांनी संताजी घोरपडे यांच्या नावाला पसंती दिली आहे. पण या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे महायुतीतून इच्छुक आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून कोरे यांच्या जवळ गतवेळचे उमेदवार अशोकराव माने आहेत. पण भाजपने या जागेवर दावा केला आहे.

शिवाय शिवसेना शिंदे गट एका माजी आमदाराला या ठिकाणाहून उतरवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडीकडे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पण शिवसेना ठाकरे गटाचे सुजित मिंचेकर हे देखील इच्छुक आहेत शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजीव आवळे यांनी देखील तयारी सुरू केली आहे.

Mahayuti Vs MVA
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : "माफी मागायची सोडून...", शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरून काँग्रेस नेत्याचे PM मोदी अन् CM शिंदेंवर टीकास्र

चंदगडमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारीची शक्यता आहे. पण भाजपचे आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर हे देखील विधानसभा निवडणुकीला इच्छुक आहेत. महाविकासमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, अप्पी पाटील हा वाद राहणारच आहे.

राधानगरी मतदारसंघातून महाविकासकडून जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, राहुल देसाई, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात उमेदवारीतून स्पर्धा निर्माण झाली आहे. ए वाय पाटील आणि के पी पाटील मेहुणी पाहुणे असले तरी त्यांच्यातील इर्षा आणि स्पर्धा ही राजकीय संघर्षाच्या पुढे गेली आहे. तो निवडून येण्यापेक्षा त्याला पाडले कसे जाईल याचाच विचार या दोघांमध्ये अधिक होतो.

इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल महायुतीतून रिंगणात उतरल्यास माजी आमदार सुरेश हळवणकर यांची गोची होणार आहे. भाजपने या जागेवर सुरेश हळवणकर यांच्यासाठी दावा केला आहे. त्यामुळे हळवणकर यांची भूमिका काय असणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Mahayuti Vs MVA
NCP SP Vs Mahayuti : शरद पवार गटाने चक्क पेपर छापून केले महायुतीच्या विरोधात आंदोलन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com