Anil Babar Profile : पश्चिम महाराष्ट्रातील 'पाणीदार आमदार' अनिल बाबर

Anil Babar Passed Away : शेती पिकली तर शेतकरी वाचेल, लोकांना रोजगार मिळेल.
Anil Babar
Anil Babar Sarkarnama
Published on
Updated on

सचिन निकम

Anil Babar Profile : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचा एकच ध्यास होता, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायला मिळाला पाहिजे. या ध्यासाने झपाटून टेंभू योजना कशी पूर्ण होईल, त्यासाठी ते झटत होते. टेंभूचे कामही पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असून संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे प्रश्न विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडले. त्यावर चर्चा करून सोडविण्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील असत. घाटावरील दुष्काळाला हटवणाऱ्या अनिलभाऊंचा संघर्षमय प्रवास अचानक थांबल्याने सर्वसामान्य पोरका झाल्याची भावना व्यक्त होत आहे. (mla Anil Babar Passed Away)

द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना शेडनेट व प्लास्टिक आच्छादनासाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे, म्हणून विधानसभेत चर्चा घडवून आणली. सकाळी आठ वाजता मतदारसंघातील अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रवास सुरू होणारा रात्री बारालाच थांबत असे. जनतेच्या कामाला ते आधी प्राधान्य देत. खानापूर-आटपाडी तालुक्यातील व विसापूर सर्कलमधील लोकांची विविध कामांसाठी भाऊंच्या कार्यालयात नेहमीच गर्दी असे. मतदारसंघ असो अथवा मतदारसंघाच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा अन्य काम घेऊन आला तर काम व त्याच्या अडचणी सोडविण्याचा ते प्रयत्न करीत.

शासनदरबारी पाठपुरावा करून रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारसंघातील गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण करून घेतले. त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त झाले. टेंभू योजनेबरोबर शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील ओढ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करून ओढ्यावर साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्याचा फायदा शेतीबरोबर विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास झाला. आतापर्यंत टेंभूच्या पाचव्या टप्प्याची कामे पूर्ण झाली आहेत. टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला.‌ टेंभूच्या सहाव्या टप्प्याचेही काम लवकरच सुरू होईल. टेंभूचे पाणी खानापूर तालुक्यात येण्यापूर्वी दुष्काळी स्थिती होती. माळरानावर नुसती कुसळं दिसत होती. लोकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले. काहीजण पोट भरण्यासाठी गाव सोडून शहरात गेले. तेथे रोजी-रोटी शोधू लागले.

आमदार अनिल बाबर यांनी शेती पिकली तर शेतकरी वाचेल, लोकांना रोजगार मिळेल. त्यासाठी पाण्याची गरज असल्याचे ओळखून टेंभूचे पाणी मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले व त्याला यश आले. सध्या मतदारसंघात टेंभूचे पाणी वाहताना दिसत आहे. हमखास पैसे मिळवून देणाऱ्या ऊस पिकाकडे शेतकरी वळले. आता मतदारसंघात पाण्यामुळे सर्वत्र ऊस पाहण्यास मिळत आहे. चारशे ते पाचशे टनापर्यंत शेतकरी उसाचे उत्पन्न घेऊ लागला आहे. उसाबरोबर द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, भाजीपाला शेतकरी पिकवू लागला आहे.‌ त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक सुबत्ता खेळताना दिसत आहे.

काही महिन्यांत टेंभूची कामे पूर्ण होऊन दुष्काळी दोन तालुके सुजलाम्-सुफलाम् होणार आहेत. त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांनीही मतदारसंघातील लोकांशी संपर्क ठेवून लोकांच्या अडी-अडचणी सोडवत आहेत. नगरसेवक अमोल बाबर विटा शहरातील नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न ‌करीत‌‌‌ आहेत. दोघांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात युवा संघटन केले आहे.‌

R...

Anil Babar
Anil Babar Passed Away:शिंदे गटातील आमदार अनिल बाबर यांचे निधन

अनिलभाऊंनी विटा शहरातील उपनगरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते आता चकाचक झाले आहेत. अजून काही कामे प्रस्तावित आहेत. त्यांनाही निधी उपलब्ध होऊन ती कामे मार्गी लागतील. विटा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. तेथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले आहे. त्या ठिकाणी शंभर खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारले जाणार आहे. त्यामुळे विटा शहरासह खानापूर तालुक्यातील गोरगरीब लोकांचा फायदा होणार आहे. उपचारासाठी सांगली, कऱ्हाड शहरात जाण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत होणार आहे.

मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जिल्ह्यात झाली होती. त्यासाठी कोयना धरणातून पाणी कृष्णा नदीत सोडावे, यासाठी पाठपुरावा केला. पाणी सोडण्यात आले. त्यामुळे लोकांना काहीअंशी दिलासा मिळाला. खानापूर मतदारसंघातील पारे, ढवळेश्वर व आटपाडी तालुक्यातील तलावांच्या सुशोभीकरणासाठी साडेनऊ कोटींचा निधी अनिलभाऊंनी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे या तलावांचे सुशोभीकरण होऊन काही तलाव पर्यटनस्थळे बनतील. दोन्हीही युवा नेत्यांनी खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये युवकांचे मोठे संघटन केले आहे. या दोन्ही पुत्रांची आमदार अनिलभाऊ यांना मोलाची साथ लाभत आहे. शेतीला पाणी मिळावे, यासाठी झटणारे पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com