Barshi Agitation : मनोजदादा, तुम्ही महाराष्ट्राचे मालक झालात का ? बार्शीत जरांगेंविरोधात ठिय्या आंदोलन सुरू

Anna Shinde Vs Manoj Jarange Patil : बार्शीचे अण्णा शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना तीन सप्टेंबर रोजी अकरा प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे ९ सप्टेंबरपर्यंत द्यावीत, अन्यथा बार्शीच्या शिवसृष्टीत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदेालन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला होता.
Barshi Agitation
Barshi AgitationSarkarnama
Published on
Updated on

Barshi, 09 September : एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत, तर दुसरीकडे बार्शीतील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांना विचारण्यात आलेल्या अकरा प्रश्नांची उत्तरे न दिल्याने बार्शी येथे त्यांच्याविरोधात अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

बार्शीचे अण्णा शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना तीन सप्टेंबर रोजी अकरा प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे ९ सप्टेंबरपर्यंत द्यावीत, अन्यथा बार्शीच्या (Barshi) शिवसृष्टीत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदेालन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला होता. जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्या प्रश्नाची उत्तर न दिल्याने त्यांनी आजपासून बार्शीत आंदोलन सुरू केले आहे.

अण्णा शिंदे (Anna Shinde) म्हणाले, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम मनोज जरांगे पाटील करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला शरद पवारांनी (Sharad Pawar) खुटा मारला आहे. आरक्षणाचा प्रश्न बाजूला राहिला आणि तुम्ही लोकांना धमक्या द्यायला लागले. तुम्ही काय महाराष्ट्राचे मालक झालात का दादा.?

Barshi Agitation
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची माफी मागा, अन्यथा बार्शीत येऊन धडा शिकवू; संभाजी ब्रिगेडचा राजेंद्र राऊतांना इशारा

तुमचा अहंकार वाढला आहे. तुमच्या डोक्यात हवा घुसली आहे. तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, अशीच शंका निर्माण होत आहे. तुम्ही ज्यांना मदत करत आहात, ते मराठा आरक्षणासाठी काय करणार आहेत, हे त्यांना विचारलं पाहिजे. तुम्हाला भेटायला येणाऱ्या नेत्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवताय, हे कितपत योग्य आहे, असा सवालही अण्णा शिंदे यांनी उपस्थित केला.

अण्णा शिंदे पुढे म्हणाले, आमदार राजेंद्र राऊत यांची एक चूक सांगावी. तुमच्या सभेला त्यांनी सहकार्य केले. तुमचं उपोषण सोडायला आलेल्या राजेंद्र राऊतांच्या भेटीचं तुम्ही असं राजकारण कराल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण, त्यांच्याविरोधात यापुढे बोलाल तर याद राखा. त्यांच्याविरोधात बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही.

Barshi Agitation
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं कुटुंबच गुजराती व्यापार मंडळाचे प्रमुख लाभार्थी; नीतेश राणेंचा पलटवार

या राज्यात अजून मोगलाई लागलेली नाही. आम्हालाही बोलता येतं. पण आम्ही सभ्यता सोडणार नाही. तुमच्यात आणि आमच्यात आता अंतर पडलं आहे. तुमचा आमचा आता कोणताही संबंध नाही. आम्ही आमच्या परीने आरक्षणासाठी काम करत राहणार आहोत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com