Pandharpur Politics : शरद पवार पंढरपुरात कोणाच्या हाती देणार तुतारी?; भाजप नेत्याचीही चर्चा!

NCP Sharadchandra Pawar Party : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 07 September : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. अगदी विरोधी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविण्याचीही अनेकांची तयारी दिसत आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांचीही भर पडली आहे. त्यांनीही नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट उमेदवारीची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून तुतारीची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच, भगीरथ भालके हेही पंढरपूर मतदारसंघातून (Pandharpur Constituency) इच्छूक आहेत. त्यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही विधानसभेसाठी तुतारी हाती घ्यावी, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. मात्र, परिचारकांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Sharad Pawar NCP
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी ‘लालबागच्या राजा’च्या चरणी

पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोलापूर दौऱ्यात भेट घेतली होती. याशिवाय परिचारक गटातील पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख आणि सुभाष देशमुख हेही तुतारीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

मंगळवेढ्यातून या अगोदर राहुल शहा यांनी राष्ट्रवादीकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी मंगळवेढ्याचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांनीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टेंभुर्णी येथे भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली.

सध्या तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Sharad Pawar NCP
Narsayya Adam Master : काँग्रेस आडम मास्तरांना दाखवणार ‘कात्रजचा घाट’; माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

'तरुण चेहऱ्याला संधी मिळावी'

यासंदर्भात शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी म्हणाले, पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघात वाढलेल्या नवमतदारांची संख्या पाहता सर्वाधिक मतदार हे मंगळवेढा तालुक्यातील आहेत, त्यामुळे उमेदवारी देताना मंगळवेढ्याचा विचार व्हावा. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले योगदान दिले आहे, अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीत गमावलेली जागा पुन्हा मिळविण्यासाठी तरुण चेहऱ्याला उमेदवारी द्यावी, यासाठी आम्ही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com