Solapur Dcc Bank : मोहिते पाटील, परिचारक, माने, म्हेत्रे, शिंदे, आवताडे, हसापुरे यांचे कारवाईला चॅलेंज; अर्ज अवैधतेविरोधात सहनिबंधकांकडे धाव

Solapur Political News : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज अवैध ठरलेल्या सात माजी संचालकांनी सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे अपील केले. या अपिलावर 6 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
prashant paricharak-siddharam mhetre-ranjitsinh mohite patil-Dilip Mane-sanjaymama shinde
prashant paricharak-siddharam mhetre-ranjitsinh mohite patil-Dilip Mane-sanjaymama shindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 05 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या माजी सात संचालकांनी सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे अपिल केले आहे. या अपिलावर उद्या ( शुक्रवारी, ता. ६ नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. सहकार कायदा कलम ८८ अन्वये व सहकार कायदा कलम ११० अ अन्वये झालेल्या कारवाईमुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी हे अर्ज अवैध ठरविले होते.

माजी संचालकांमध्ये माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे, रश्‍मी बागल या आठ जणांचे अर्ज कलम ८८ च्या कारवाईमुळे अपात्र करण्यात आले आहेत. यातील जगताप, बागल व राजन पाटील वगळता इतर पाच संचालकांनी अपिलात धाव घेतली आहे.

कलम ११० अ अन्वये झालेल्या कारवाईमुळे माजी संचालक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे अर्ज अपात्र झाले आहेत, या दोघांनीही अपिलात धाव घेतली आहे.

या अपिलावर शुक्रवारी (ता. ६) सुनावणी होणार असून, या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणीही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यास या माजी संचालकांना उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालया दाद मागण्याचा पर्यय उपलब्ध असणार आहे.

prashant paricharak-siddharam mhetre-ranjitsinh mohite patil-Dilip Mane-sanjaymama shinde
Satej Patil Politics : सतेज पाटलांना 'गोकुळ'च्या लढ्यात हात्तीच बळ! राहुल गांधींनी पाठींबा देताच मोठी घोषणा, न्यायालयात अन् रस्त्यावरही...

अर्ज माघारीची प्रक्रिया १७ नोव्हेंबरपर्यंत राबविली जाणार आहे. त्यानंतर १८ नोव्हेंबरला चिन्हवाटप व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यापूर्वी अपिलात गेलेल्या माजी संचालकांना त्यांच्यासारखा निर्णय करून घेणे आवश्‍यक असणार आहे.

prashant paricharak-siddharam mhetre-ranjitsinh mohite patil-Dilip Mane-sanjaymama shinde
Gokul Politics : गोकुळमधील 4 शासननियुक्त सदस्यांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर : सतेज पाटलांच्या बाजूने राहुल गांधी मैदानात

राम सातपुतेंच्या विरोधात जानकर उच्च न्यायालयात?

छाननीमध्ये अर्ज नामंजूर झाल्यास सहनिबंधक यांच्याकडे अपिल करता येते. छाननीत अर्ज मंजूर झाल्यास, त्या विरोधात उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून दाद मागता येते. छाननीत अर्ज मंजूर झालेल्यांमधील राम सातपुते यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी आमदार उत्तम जानकर यांच्या गटाने केली असल्याचे समजते. जानकर यांच्या गटाने व या शिवाय आणखी कोणी न्यायालयात धाव घेतली आहे का?, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories