Ranjitsingh Naik Nimbalkar : माढ्यातून मोकळे झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर पुणे मोहिमेची जबाबदारी

Lok Sabha Election 2024 : माढ्याची निवडणूक संपताच अवघ्या दोन दिवसांतच गुरुवारी (ता. 09 मे) निंबाळकर यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
Ranjitsingh Naik Nimbalkar
Ranjitsingh Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 May : माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान संपल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे माढ्यातून रिकामे झालेले निंबाळकर यांच्यावर पुणे जिंकण्याची मोहिम सोपविण्यात आली आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना भाजपमधून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आव्हान दिले होते. अगोदर थोडीसी कठीण वाटणारी माढ्याची निवडणूक निंबाळकर यांनी शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी चुरशीची केल्याचे दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjitsingh Naik Nimbalkar
Ranjitsinh Mohite Patil : माढ्याचे मतदान होताच रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा ॲक्टिव्ह; शिवरत्नवर बोलावली बैठक

माढ्याची निवडणूक संपताच अवघ्या दोन दिवसांतच गुरुवारी (ता. 09 मे) निंबाळकर यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे

मोहोळ यांच्यापुढे काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि मनसेला जय महाराष्ट्र करून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे यांचे आव्हान आहे. धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात होणार विरोध लक्षात घेता पुण्यात भाजपकडून मराठा नेता मोहोळ यांच्या मदतीसाठी देण्यात आलेला आहे.

Ranjitsingh Naik Nimbalkar
Amol Kolhe's Announcement : डॉ. अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; पुढची पाच वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार

माढा लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत ६३.६५ टक्के मतदान झाले असून गेल्या २०१९ तो ६३ टक्के होता. म्हणजे माढ्यात ०. ६३ टक्के मतदान वाढले आहे. हा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात जाणार, याची उत्सुकता आहे.

त्याचबरोबर सर्वाधिक मतदान हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गृहतालुका असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तसेच, माण-खटाव आणि माळशिरसमध्ये चांगले मतदान झाले आहे. या तीन तालुक्यांवर विजयाचे गणित सुटण्याची शक्यता आहे.

Ranjitsingh Naik Nimbalkar
Pune Lok Sabha Election 2024: पुण्यात मोहोळांसाठी फडणवीसांची 'फिल्डिंग'; म्हणाले, 'काम करणाऱ्या मोदींसाठी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com