Solapur, 10 May : लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त असलेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. नीरा कालवा लाभधारक शेतकऱ्यांची मोहिते पाटील यांनी उद्या (ता. ११ मे) शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ते कोणती भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले होते. त्यामुळे मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात बंड केले होते. विशेषतः धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी मोहिते पाटील कुटुंबीयांतील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे भाजपसोबत राहण्याच्या भूमिकेचे हेाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून त्यांच्यासोबत राहण्याच्या मताचे रणजितसिंह मोहिते पाटील होते. मात्र, निवडणूक होईपर्यंत तुम्ही घरी येऊ नका, असे जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना सांगितले होते. तसेच, भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ते निवडणुकीपासून लांब होते. भाजपच्या आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्याही व्यासपीठावर ते दिसले नाहीत.
माढा लोकसभा मतदारसंघाचे ७ मे रोजी मतदान संपले आहे. लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त असणारे रणजितसिंह मोहिते पाटील हे पुन्हा एकदा राजकीयदृष्टीने मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. त्यांनी नीरा कालवा लाभधारक शेतकऱ्यांची उद्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली आहे.
लोकसभा निवडणूक काळात भारतीय जनता पक्ष आणि कुटुंबापासून अलिप्त असणारे रणजितसिंह मोहिते पाटील उद्या शिवरत्न बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत कोणती भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.