Sanjay Patil Vs  Vishal Patil
Sanjay Patil Vs Vishal Patil sarkarnama

Sanjay Patil Vs Vishal Patil : ये खाली बस! कार्यकर्ते अंगावर धावले; सभेत आजी-माजी खासदार भिडले

Sanjay Patil Vs Vishal Patil BJP Congress Tasgaon : संजय पाटील यांनी भाषणात विशाल पाटील यांचे नाव घेताच विशाल पाटील हे व्यासपीठावर उभे राहिले. संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर ते बोलत असताना एकच गोंधळ झाला.
Published on

Sanjay Patil Vs Vishal Patil : जाहीर कार्यक्रमात सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात खडाजंगी झाली. तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बाह्य रिंग रोडच्या कामाच्याबाबत विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला संजय पाटील यांनी प्रत्युत्तर देत असताना हा वाद झाला. या वादावादीचं पर्यवसान कार्यकर्ते अंगावर धावून जाण्यात झाले.

व्यासपीठावर पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुमन पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे यांच्यासमोरच आजी माजी खासदार भिडले. सुदैवाने पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टाळला.

बाह्यरिंग रोडच्या कामाबाबत वक्तव्य करताना खासदार विशाल पाटील म्हणाले, 'तासगावात भरपूर विकास होतो आहे. नितीन गडकरीसाहेबांचा विट्यात कार्यक्रम झाला. ते सांगत होते विशाल तेवढं रोहित पाटलांना निरोप दे रोडच काम मी मंजूर केलं आहे. ते भाजपचं असून देखील राष्ट्रवादीच्या युवक नेत्याने, आमदाराने मागणी केली तरी येवढा मोठा निधी देतात. विकासाच्या दृष्टिने हे चांगलचं आहे. विकासाच्या दृष्टिने गटतट विसरून आपण एकत्र येऊ.'

Sanjay Patil Vs  Vishal Patil
Assembly Election 2024 : भाजपची सत्ता ‘या’ सहा कारणांमुळे जाणार; काँग्रेसनंही संधीचं सोनं केलं...

विशाल पाटलांनी बाह्यरिंगरोडवर केलेल्या वक्तव्याला संजय पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, राजकारणात एकमेकांशी मतभेद असतात. पण येवढं लेवलं सोडू नका की दुसऱ्याने केलेल्या कामात जाऊन आपण नाचावं आणि त्याचे बोर्ड लावावे. विशाल पाटील तुम्ही काल खासदार झालाय. संजय पाटलाचे आणि नितीन गडकरीसाहेबांचे संबंध सर्व दुनियेला माहिती आहे.

संजय पाटील यांनी भाषणात विशाल पाटील यांचे नाव घेताच विशाल पाटील हे व्यासपीठावर उभे राहिले. संजय पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर ते बोलत असताना एकच गोंधळ झाला. त्यावेळी ये खाली बस असं संजय पाटील विशाल पाटलांना उद्देशून म्हणाले. व्यासपीठाकडे कार्यकर्ते धावले. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वांना शांत केले.

संजय पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की आता जशास तसे उत्तर देण्याचे धोरण आम्ही घेतले आहे.

Sanjay Patil Vs  Vishal Patil
Kiren Rijiju News : मुस्लिमांनी आम्हाला मतदान केल्यास त्यांना खासदार बनवू, मंत्रीही करू: रिजिजू यांचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com