Sanjay Raut on Deepak Kesarkar : दीपक केसरकरांनी ती गोष्ट लपवली, त्यांना अटक करा; संजय राऊतांची मागणी

Satara Politics: संजय राऊत आज पाटण दौऱ्यावर आहेत.
Sanjay Raut on Deepak Kesarkar :
Sanjay Raut on Deepak Kesarkar :Sanjay Raut

Sanjay Raut Criticized Deepak Kesarkar : आमदारांनी केलेले बंड यशस्वी झाले नसते, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. केसरकर यांच्या या धक्कादायक खुलाश्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच मंत्री दीपक केसरकर यांना अटक करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत आज पाटण दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या दाव्याबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी आत्महत्येबाबत केसरकरांशी चर्चा केली असेल. काही लोक सती जातात. मालक गेल्यावर सती जातात. तसे हे लोकही जाणार होते का? ते पाहावं लागेल. केसरकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. आत्महत्येची एवढी मोठी माहिती दडवली कशी? इतक्या मोठ्या महान नेत्याने आत्महत्या केली असती तर देशावर, राज्यावर आणि जगावर संकट कोसळलं असतं. त्यामुळे केसरकरांना पहिले ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी उपरोधिक टीका करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मागणी केली.

Sanjay Raut on Deepak Kesarkar :
Udayanraje Vs Shivendraraje : दोन राजांच्या वादात आता राऊतांची एन्ट्री ; म्हणाले, "हा तर छत्रपतींच्या .."

बिहारच्या पाटण्यात दोन दिवासंपूर्वी देशातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली.या बैठकीला उद्धव ठाकरे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूलाच बसले होते. या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यावर कालच भाष्य केलं आहे. मेहबूबा मुफ्ती या मुख्यमंत्री झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्या शपथविधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीही गेले होते. त्यामुळे हा प्रश्न आधी मोदींना विचारा,मग आम्ही उत्तर देऊ.

पंतप्रधान मोदी कधीच मणिपूरविषयी बोलणार नाहीत. त्यांच्या हातून आता मणिपूर गेलं आहे. तिथे हिंदू-मुस्लिम वाद करता येत नाही. ते करता आलं असतं तर पंतप्रधान बोलले असते, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com