Kolhapur Politics : अरुण डोंगळेंची तलवार म्यान; पाटील- मुश्रीफांनी दटावताच गोकुळच्या अध्यक्ष पदावरून पायउतार

kolhapur Politics : मागच्या आठवड्यापासून गाजत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदावरून अखेर अरुण डोंगळे पायउतार झाले आहेत. आज (20 मे) दुपारी त्यांनी गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे राजीनामा सुपूर्त केला.
Arun Dongale officially resigns as Gokul Dairy Chairman
Arun Dongale officially resigns as Gokul Dairy ChairmanSarkarnama
Published on
Updated on

kolhapur Politics : मागच्या आठवड्यापासून गाजत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदावरून अखेर अरुण डोंगळे पायउतार झाले आहेत. आज (20 मे) दुपारी त्यांनी गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे राजीनामा सुपूर्त केला. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी डोंगळे यांचे बंड मोडीत काढण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

मागील आठवड्यापासून कोल्हापूरमध्ये गोकुळ अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. त्यापूर्वी 15 मे रोडी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच डोंगळे यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर मला राजीनामा न देण्याविषयी सूचना असल्याचे सांगत डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.

डोंगळे यांनी कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली. माझा अध्यक्षपदासाठी आग्रह नाही. मात्र होणारा नवीन अध्यक्ष महायुतीचाच असावा अशी दोन्ही नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळेच राजीनामा देऊ नका अशा सूचना मला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून दिल्या आहेत, त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सुत्रे हाती घेत बैठकांचा धडाका लावला.

Arun Dongale officially resigns as Gokul Dairy Chairman
Kolhapur Politics : मुश्रीफांच्या आशीर्वादाने 'डोंगळे' गोकुळचे अध्यक्ष झाले... आता त्यांनाच का नडतायत? फडणवीस-शिंदेंच्या जवळ कसे गेले?

डोंगळे यांच्याभोवती दबावाचे राजकारण तयार करून ठरल्याप्रमाणे त्यांना राजीनामा द्यायला लावला. पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार असल्याने अध्यक्षपद महत्वाचे बनले आहे. अशात थेट फडणवीस यांनीच यात लक्ष घातल्याने हसन मुश्रीफ यांचाही संताप झाला होता. पण फडणवीस यांना गोकुळमधील काहीही माहिती नाही असे म्हणत त्यांनी गोकुळमधील सतेज पाटील यांच्यासोबतची मैत्री तोडण्यास स्पष्ट नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com