Ranjitsinh Mohite Patil : पालकमंत्र्यांची एन्ट्री होताच रणजितसिंह मोहिते पाटलांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला!

Punyashlok Ahilyadevi Holkar University News : रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजप नेते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोहिते पाटलांच्या उपस्थितीत त्यांच्यावरील कारवाईसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी रणजितदादांनी मान खाली घातली होती.
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar Gore
Ranjitsinh Mohite Patil-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 May : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजप नेते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोहिते पाटलांच्या उपस्थितीत त्यांच्यावरील कारवाईसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी रणजितदादांनी मान खाली घातली होती. रणजितसिंह मोहिते पाटील आजही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत विद्यापीठात आले होते. त्यांच्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आले. पण त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत रणजितसिंह मोहिते पाटील हे गोरे यांच्या कानात बोलून कार्यक्रमस्थळावरून निघून गेले. ते कानात काय कुजबुले याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil ) एकत्र आले होते.

विद्यापीठात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पीएम उषा योजनेतून दोन नवीन इमारतींची पायाभरणी करण्यात आली. विद्यापीठात चंद्रकांतदादांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच, विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चंद्रकांतदादांसोबत आमदार रणजितसिंह माेहिते पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे कार्यक्रमाला थोडे उशीरा आले. गोरे आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला विद्यापीठाच्या वतीने मंत्री, आमदार आणि इतर मान्यवरांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वतीने अहिल्यादेवींची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभानंतर काही वेळातच रणजितसिंह मोहिते पाटील जागेवरुन उठले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कानात मोहिते पाटील यांनी काहीतरी सांगितले. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कानातही काही तरी सांगितले. त्या दोघांची परवानगी घेऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्टेज सोडले. म्हणजेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एन्ट्री होताच अवघ्या पाच ते सात मिनिटांतच मोहिते पाटील यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

रणजितसिंह कानात काय बोलले?

रणजितसिंह मोहिते पाटील हे चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या कानात काय बोलले, याची माहिती मिळू शकली नाही. तसेच, ते कार्यक्रम सोडून लवकर का निघून गेले, याबाबतच कारण गुलदस्त्यात आहे. मात्र व्यासपीठावरील हालचाली पाहता मोहिते पाटील हे या दोघांची परवानगी घेऊन कार्यक्रमातून निघून गेल्याचे जाणवत होते.

त्या घटनेची धास्ती

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी (ता. २९ मे) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी पत्रकार परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या समोरच त्यांच्यावरील कारवाईबाबतचा प्रश्न बावनकुळेंना विचारण्यात आला होता. बावनकुळे उत्तर देत असताना आमदार मोहिते पाटील यांनी मान खाली घातली होती. त्या घटनेची धास्ती मोहिते पाटील यांनी घेतली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळेच त्यांनी आज गोरे यांच्या एन्ट्रीनंतर अवघ्या काही मिनिटांतच रणजितसिंह मोहिते पाटील कार्यक्रमातून बाहेर पडणे पसंत केले. त्यांनी हा निर्णय का घेतला, याची कुजबूज कार्यक्रमस्थळी रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com