Chandrakant Patil : 'मी देखील चळवळीतून पुढं आलोय, आवाज वाढवायचा नाय'; चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

Shaktipeeth Highway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रिम प्रोजेक्टला राज्यात विरोध होत असून तो रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र सरकार तो रेटत असल्याने आता शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
Chandrakant Patil Shaktipeeth Highway protester
Chandrakant Patil Shaktipeeth Highway protestersarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्यभर शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असतानाही तो रेटला जातोय. यामुळे शेतकरी संतापले आहेत. हा महामार्ग मागणी नसतानाही शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात असल्याने बाधितांकडून मोठा विरोध होत आहे. तर हा माहामार्ग रद्द करण्याची मागणी नागपूरपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. पण ती मागणी मान्य होत नसल्याने सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या रोषाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सामना करावा लागला आहे. त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करा, अशी मागणी होत असतानाही आता जिल्ह्यात जमीन मोजणीचे कामालाही गती येणार आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर एक बैठक झाली होती. तर जमीन मोजणीबाबत संबंधीत शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. याचवेळी जिल्ह्यात पुन्हा एकदा सरकार विरोधात बाधित शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समिती असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान आज (ता.1) जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुरू असतानाच उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली. यावेळी काही शेतकऱ्यांनी आवाज चढवल्याने चंद्रकांत पाटलांना ते रूचलं नाही आणि त्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. यावरून चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

Chandrakant Patil Shaktipeeth Highway protester
Chandrakant Patil : अजितदादा, एकनाथ शिंदेंनंतर आता चंद्रकांत पाटलांचाही फडणवीसांच्या 'गृह'खात्यावर डोळा?

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, 'मी देखील चळवळीतून पुढं आलो असून माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलायचे नाही, असा दम भरला. तसेच या महामार्गाला केवळ पाच शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगत तेथून पाय काढला. यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप शेतकऱ्यांना मागे करण्याचा प्रयत्न केला. यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता.

शेतकऱ्यांच्या मागण्या उभाराहून पूर्णपणे ऐकून न घेतल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर त्यांची गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसानी आंदोलकांना गेटवर अडवून धरले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसर दणाणून गेला होता.

Chandrakant Patil Shaktipeeth Highway protester
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा फडणवीसांच्या गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर डोळा? म्हणाले, 'मी सिनिअर, फक्त...'

चंद्रकांत पाटलांनी पोलिसांनाच झापलं

शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांशी खडाजंगी सुरू असतानाच पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चंद्रकांत पाटील, शेतकऱ्यांना शांत केलं. पण पुढे येणाऱ्या पोलिसांवर ते संतापले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com