Satara Politic's ; नितीन पाटील, उंडाळकरांनी डाव फिरवला; मनोहर शिंदे भाजपमध्ये जाताच कट्टर विरोधक राष्ट्रवादीच्या वाटेवर

Nagar Parishad Election 2025 : मलकापूरमध्ये नगरपालिका निवडणुकीआधी मोठे राजकीय वादळ उठले असून मनोहर शिंदेंच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे कट्टर विरोधक अशोकराव थोरात राष्ट्रवादीकडे वळल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
Nitin Patil-Ashokrao Thorat-Udaysinh Patil Undalkar
Nitin Patil-Ashokrao Thorat-Udaysinh Patil UndalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. मलकापूरमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय उलथापालथ सुरू असून माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने समीकरणे बदलली आहेत.

  2. शिंदेंचे कट्टर विरोधक अशोकराव थोरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने झुकत असून खासदार नितीन पाटील आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी त्यांच्या जोडणीसाठी प्रयत्न वाढवले आहेत.

  3. मलकापूरमध्ये भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असताना शिंदे–थोरात वैरामुळे दोन्ही गट स्वतंत्रपणे मजबूत राजकीय स्थान मिळवण्याच्या तयारीत आहेत.

Karad, 14 November : नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कऱ्हाडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कऱ्हाड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपरिषदेची सत्ता एकहाती जिंकण्यासाठी अनेक दिग्गजांना पक्षात घेतले आहे. त्यात मलकापूरचे माजी नगराध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मनोहर शिंदे यांना फोडून भाजपमध्ये आणले आहे. दुसरीकडे, मनोहर शिंदेंनी भाजपमध्ये जाताच त्यांचे कट्टर विरोधक शेतीमित्र अशोकराव थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत, त्यासाठी खासदार नितीन पाटील, ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी विशेष प्रयत्न चालवले आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे (Manohar Shinde) यांनी मलकापूर शहराची घडी बसवली आहे. त्यांनी राबवलेल्या चोवीस तास पाणी योजनेचे देशभरात कौतुक झाले आहे. मात्र, यात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा मोठा वाटा होता. आतापर्यंतच्या मनोहर शिंदे यांच्या वाटचालीत पृथ्वीराजबाबांचा मोठा वाट राहिलेले आहे, त्या शिंदे यांनीच चव्हाणांची साथ सोडून भाजपत प्रवेश केला आहे, त्यामुळे मलकापूरमध्ये भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.

मलकापूरमध्ये (Malkapur) माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी विकासाचा धडाका लावलेला असला तरी त्यांचे विरोधकही तितकेच प्रबळ आहेत. मलकापूरला ग्रामपंचायत असल्यापासून माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्याविरोधात शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी राजकीय भूमिका घेतलेली आहे. माजी मंत्री (स्व.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे थोरात हे एक महत्वपूर्ण शिलेदार होते.

Nitin Patil-Ashokrao Thorat-Udaysinh Patil Undalkar
Beed NCP : डॉ. योगेश क्षीरसागरांची तिरकी चाल; राष्ट्रवादीही क्षीरसागरांना वगळून नवा पॅटर्नच्या तयारीत!

माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासोबत असल्याने मध्यंतरीच्या काळात अशोकराव थोरात यांनी भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले गटाशी जुळवून घेतले होते. मात्र, माजी उपनगराध्यक्ष शिंदे हेच भाजपमध्ये गेल्याने सध्या थोरात स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत, त्याची चर्चा मतदारसंघात आहे.

Nitin Patil-Ashokrao Thorat-Udaysinh Patil Undalkar
Yatin Kadam Politics: भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर ठाम; एकाच वेळी भुजबळ आणि शिवसेना शिंदेंशी संपर्क?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील पाटील यांनी दिवाळीमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात खासदार नितीन पाटील, ॲड. उंडाळकर यांच्यासोबत अशोकराव थोरात हेही उपस्थित होते, त्यामुळे थोरात यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

1. मनोहर शिंदे यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला?
भाजपच्या एकहाती सत्तेच्या तयारीत त्यांना महत्वाची भूमिका देण्यात आली म्हणून त्यांनी पक्षांतर केले.

2. अशोकराव थोरात राष्ट्रवादी काँग्रेसकडे का झुकत आहेत?
मनोहर शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतंत्र भूमिका घेत राष्ट्रवादीसोबत समीकरण मजबूत करण्यास सुरुवात केली.

3. मलकापूरच्या राजकीय समीकरणांमध्ये काय मोठा बदल घडला आहे?
चव्हाणांचे निकटवर्तीय शिंदे भाजपमध्ये गेल्याने विरोधी गटांचे पुनर्गठन सुरू झाले आहे.

4. भाजपची आगामी निवडणूक रणनीती काय आहे?
मलकापूर नगरपालिका स्वबळावर जिंकण्यासाठी मोठे नेते व स्थानिक दिग्गजांना पक्षात घेण्याची मोहीम चालू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com