Beed NCP : डॉ. योगेश क्षीरसागरांची तिरकी चाल; राष्ट्रवादीही क्षीरसागरांना वगळून नवा पॅटर्नच्या तयारीत!

Nagar Palika Election 2025 : डॉ. योगेश क्षीरसागर भाजपसोबत जाण्याची चर्चा वाढल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना वगळून सर्व ५३ जागांसाठी स्वतंत्र तयारी सुरू केली असून पक्षांतर्गत तणाव अधिक तीव्र झाला आहे.
yogesh kshirsagar-Ajit Pawar
yogesh kshirsagar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on
  1. डॉ. योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी व नेतृत्वावरून गंभीर मतभेद निर्माण झाले असून दोन्हीकडून स्वतंत्र रणनीती आखली जात आहे.

  2. राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षपद रिपाइंला देण्याच्या आणि शिवसेना-शिवसंग्रामला सोबत घेण्याच्या तयारीत असून ५२ नगरसेवकांची यादी जवळपास तयार केली आहे.

  3. दुसरीकडे डॉ. योगेश क्षीरसागर हे जनता विकास आघाडी व भाजपसोबत हातमिळवणीचा पर्याय उघडा ठेवत स्वतंत्र शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत.

Beed, 14 November : आपल्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्यांना उमेदवारी नाही, निवडणुकीचे सूत्र द्यायचे तर ५२ नगरसेवकपदाचे आणि नगराध्यक्षदाचा असे सर्व ५३ उमेदवार आपणच ठरवू, अशा भूमिकेने सुरुवात करुन आता फार तर आठ उमेदवाऱ्या देऊ, इथपर्यंत आलेल्या डॉ. योगेश क्षीरसागरांचा ओढा आता भाजपसोबत हातमिळवणीचा असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षानेही डॉ. क्षीरसागरांना वगळून ५२ नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र तयारी सुरु केली आहे.

नगराध्यक्षपद रिपाइंला देत शिवसेना आणि शिवसंग्रामला सोबत घेण्याची रणनीती राष्ट्रवादीच्या (NCP) गोटात सुरु आहे. तर, इकडे डॉ. क्षीरसागर यांनीही नोंदणी असलेल्या जनता विकास आघाडीच्या माध्यमातून तयरी सुरु केली आहे. त्यांचीही भाजपसोबतही बोलणी सुरु असून भाजपचे चिन्ह किंवा आघाडी अशी त्यांची दुहेरी रणनीती सुरु आहे.

दोन्ही बाजूंनी बैठकांचे सत्र सुरु असून आज दिवसभरात मोठ्या घडमोडींची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने ते यातून काय तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

बीडमध्ये नगरपालिका आणि क्षीरसागर हे मागच्या ३० वर्षांपासूनचे समीकरण आहे. यात सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदावर राहण्याचा विक्रम डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा आहे. मागच्या वेळी त्यांच्याच घरात फुट पडली तरी उपनगराध्यक्षाच्या माध्यमातून अर्धी सत्ता क्षीरसागरांच्या घरातच राहिली होती.

yogesh kshirsagar-Ajit Pawar
BJP Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अचानक बायबाय ; दोन दिवसांपूर्वीचे 'पक्ष निरीक्षक' आज भाजपच्या गोटात

दरम्यान, आता डॉ. योेगेश क्षीरसागर हे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा वारसा चालवित असल्याने पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हाती असावीत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, व्यक्ती म्हणजे पक्ष नव्हे, एकाच व्यक्तीला सर्वाधिकाराने पक्ष दुय्यम ठरतो, अशी भूमिका पक्षातील माजी नगरसेवकांच्या गटाने मांडत त्यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याच नेतृत्वाला आव्हान दिले.

आता नगरपालिका निवडणुकीत आव्हान देणाऱ्यांना उमेदवारी नाही, अशी भूमिका डॉ. क्षीरसागर यांची आहे. मात्र, त्यांनी डॉ. क्षीरसागर यांना आव्हान दिले असले तरी ते पक्षाचे माजी नगरसेवक असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून कसे चालेल, अशी पक्षाची भूमिका आहे. यामुळे पक्ष व क्षीरसागर यांच्यातील वाटाघाटीला मूर्तरुप आलेले नाही. आता दोन्हीकडून वेगळ्या चुली मांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

yogesh kshirsagar-Ajit Pawar
Maharashtra model Bihar elections : महाराष्ट्रातील फंडे बिहारमध्ये राबवले गेले, निवडणूक प्रक्रिया निकोप होती का? बाळासाहेब थोरातांचा सवाल

त्यानुसार बीडमध्ये राष्ट्रवादीने आता स्वतंत्रपणे जुळवाजुळव करत नगराध्यक्षपद रिपाइंला देण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे. तसेच, शिवसेना आणि शिवसंग्रामला सोबत घेत नगरसेवक पदासाठीचे ५२ नगरसेवकही जुळविले आहेत. दुसरीकडे डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही जनता आघाडीची नोंदणी अगोदरच करत भाजपला सोबत घ्यायचे का?, याची चाचपणी सुरु केली आहे.

1. राष्ट्रवादी आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यात मतभेद का झाले?
नेतृत्व व उमेदवारींच्या निर्णयाधिकारावरून दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला.

2. राष्ट्रवादीची पुढील निवडणूक रणनीती काय आहे?
रिपाइंला नगराध्यक्ष, शिवसेना-शिवसंग्रामला सोबत घेऊन ५२ उमेदवारांवर स्वतंत्र लढण्याची तयारी आहे.

3. डॉ. क्षीरसागर कोणते पर्याय तपासत आहेत?
ते जनता विकास आघाडीमार्फत किंवा भाजपसोबत आघाडीच्या चर्चेत आहेत.

4. नगरपालिका निवडणुकीत काय घडू शकते?
दोन्ही बाजूंनी वेगळ्या चुली मांडल्याने कठीण त्रिकोणी किंवा चौकोनी लढत निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com