Mohite Patil : पुणे पदवीधरची निवडणूक जाहीर होताच मोहिते पाटलांनी ‘शिवरत्न’वर बोलावली बैठक; धैर्यशील मोहिते पाटलांसोबत रणजितदादाही मैदानात...

Pune Graduate Constituency election 2026 : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी समर्थकांची बैठक बोलावली आहे.
Mohite Patil
Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 September : राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर पदवीधर, तर अमरावती, पुणे या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे. या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून मागील काही महिन्यांपासून पूर्वतयारी करण्यात येत आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमधील तीन पक्षांत जोरदार रस्सीखेच दिसून येत असताना आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपटले आहेत. येत्या गुरुवारी त्यासंदर्भात समर्थक आणि कार्यकर्त्यांची बैठक अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदासंघात महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. मागील निवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे या दोन्ही जागा परत मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विशेषतः पदवीधर मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कारण या मतदारसंघातून मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. सोलापूरमध्ये मोहिते पाटील आणि भाजप असा संघर्ष गेल्या काही निवडणुकीत दिसून आलेला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार सामना झाला आहे. धैर्यशील यांच्या मदतीला आता माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही येण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मोहिते पाटील यांनी येत्या गुरुवारी (ता. २४ सप्टेंबर) अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीसाठी प्रमुख कार्यकर्ते, सरपंच आणि युवा कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच ‘शिवरत्न’वर मोहिते पाटील समर्थकांची बैठक होणार आहे.

Mohite Patil
PDCC Bank Election : दौंडमध्ये आमदार-माजी आमदारांचे पत्नी, मुलांसह ठराव : Zp अध्यक्षही मुलासह मैदानात, अनेक दिग्गजांची कुटुंबालाच पसंती

या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेही मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकीय घडामोडीपासून अलिप्त असलेले रणजितसिंह आता राजकारण सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बैठकींचा धडाका लावला आहे.

Mohite Patil
Sangola Politic's : सत्तेत असूनही शहाजीबापूंच्या शिलेदारांना अधिकारी जुमानेनात; संतप्त उपसभापतीने पंचायत समितीचे काम दोन तास बंद पाडले

रणजितसिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि महाविकास आघाडीच्या व्यासपीठापासून दूर होते. मात्र, भाजपमध्ये होणारी कोंडी पाहून त्यांनी माढा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपच्या विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात मोहिते पाटील असा सामना सोलापुरात दिसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com