Ravindra Dhangekar On Chavan Resign: चव्हाणांच्या विश्वासावर काँग्रेसमध्ये आलेल्या धंगेकरांचं काय ठरलं?

Ashok Chavan Resign From Congress: 2017 मध्ये रवींद्र धंगेकर हे अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते.
Ashok Chavan - Ravindra Dhangekar
Ashok Chavan - Ravindra Dhangekar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांच्यासमवेत काँग्रेसमधून बाहेर पडतील ,असं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उभा करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेस आमदारांना त्यांच्या सद्यःस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहेत. याचवेळी चव्हाणांच्या विश्वासावर काँग्रेसमध्ये आलेल्या धंगेकरांनी या राजीनाम्यावर भाष्य करतानाच आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीवरही रोखठोक भूमिका स्पष्ट केली.

Ashok Chavan - Ravindra Dhangekar
Maharashtra Congress News : काँग्रेसकडून हालचालींना वेग, 14 फेब्रुवारीला मुंबईत बोलावली सर्व आमदारांची बैठक

पुण्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 2017 मध्ये रवींद्र धंगेकर हे अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. अशोक चव्हाण यांच्या विश्वासावर आलेले रवींद्र धंगेकर आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी राजीनामा का दिला, याचं कारण ते पत्रकार परिषद घेऊन देतील. मात्र, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. महाविकास आघाडीमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून आम्हाला निवडून आणण्यासाठी ताकद लावली. त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका धंगेकर यांनी मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रवींद्र धंगेकर म्हणाले, मी राज्यभर फिरतो. काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते आपुलकीने आणि प्रेमाने विचारतात अनेक कार्यक्रमांना बोलावतात. त्यामुळे मी एक प्रकारे काँग्रेसचा हिरो असून, माझा कुठलाही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार नाही. देशामध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे या देशामध्ये नेते नाही तर जनता ठरवणार आहे कोणाला निवडून द्यायचे ते त्यामुळे आगामी काळामध्ये जनता ठरवेल काय करायचं ते.

पुण्यातून काही माजी आमदार माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या समवेत जाण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना धंगेकर म्हणाले, अशोक चव्हाण यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता निर्णय घेईल, असं धंगेकर म्हणाले.

अशाप्रकारचे नेते काँग्रेसच्या बाहेर गेले तरीदेखील पक्ष एकसंध राहणार असून, मला भाजपने ऑफर दिली. तरी मी काँग्रेसच्या हिरो असून, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Ashok Chavan - Ravindra Dhangekar
Ashok Chavan Resigns : विश्वासघातकी..! चव्हाणांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया...

भाजपकडून काही नेत्यांना धमकावण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यावर बोलताना धंगेकर म्हणाले, मी गेल्या 25 वर्षांपासून नगरसेवक आणि आता विधानसभेचा आमदार आहे. संघर्षातून इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे संघर्षाचा मला वारसा असून, भविष्यातदेखील संघर्ष करत राहणार असल्याचे सांगत आपल्याला कोणी धमकावले तरी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Ashok Chavan - Ravindra Dhangekar
Ashok Chavan Resigns : विश्वासघातकी..! चव्हाणांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com