Hasan Mushrif On Naded Tragedy : नांदेड मृत्युकांडास अशोक चव्हाण जबाबदार; हसन मुश्रीफांनी जबाबदारी झटकली

Hasan Mushrif On Naded Tragedy : पुन्हा नांदेड होणार नाही, यासाठी प्रामाणिकपणे लक्ष देणार
Ashok Chavan, Hasan Mushrif
Ashok Chavan, Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Hasan Mushrif On Naded Tragedy : नांदेडमधील मृत्युकांडास माजी मंत्री अशोक चव्हाण जबाबदार असल्याची टीका करत वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हात झटकले. अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील आमदार आहेत. ते माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. खरेतर रुग्णालयात एक-दोन महिन्यांतून भेट देणे ही त्यांची जबाबदारी होती. त्यांनी तसे केले असते तर आज ही वेळ आली नसती, असा घणाघात मुश्रीफांनी चव्हाण यांच्यावर केला आहे. (Latest Political News)

नांदेड घटनेबाबत सांगताना हसन मुश्रीफ Hasan Mushrif म्हणाले, 'दगावलेल्या १२ लहान मुलांमध्ये नऊ मुले वेळेच्या आधी जन्माला आली होती. त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, संबंधित डॉक्टर सुटीवर गेल्याने त्या मुलांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत आजच सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचा अहवाल ते देतील,' असे मुश्रीफांनी सांगितले. तसेच आम्ही शासनाची जबाबदारी झटकत नाही, पण अशा गोष्टी यापुढे होऊ नयेत, यासाठी प्रामाणिकपणे लक्ष देणार असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

Ashok Chavan, Hasan Mushrif
Raj Thackeray Vs Ajit Pawar : 'हात पाय तोडू, राज्यात फिरू देणार नाही'; मिटकरींची टीका मनसेच्या जिव्हारी

घाटगेंना पंतप्रधान मोदी नको

'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षामधून अनेक नेते भाजपत गेले आहेत. आम्हीदेखील तीन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा दिला. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. जर या माणसाला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नको असेल, तर माझा नाईलाज आहे. त्यांचे दुःख, यातना, वेदना समजू शकतो. परमेश्वरच त्यावर इलाज करो,' असा टोला मंत्री मुश्रीफांनी भाजपचे समरजित घाटगे यांना लगावला.

कोल्हापुरात आयटी पार्क

'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पवारांनी कोल्हापुरात आयटी पार्क घोषणा केली आहे. मी आणि दीपक केसरकर तिथे उपस्थित होतो. मात्र, नक्कीच ही एक केवळ घोषणा नाही राहणार, जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे. आयटी पार्कसह काळम्मावाडी, अंबाबाई मंदिर परिसर विकास केला जाईल. सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन शहराचा जिल्ह्याचा सर्व घटकांचा विकास करू. विकासात राजकारण करण्याचे कारण नाही', असेही मुश्रीफ म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Ashok Chavan, Hasan Mushrif
Barshi Politics : राजेंद्र राऊतांचा धडाका, तर दिलीप सोपलांच्या गोटात शांतता; बार्शीच्या राजकारणात नेमकं घडतंय काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com