Raj Thackeray Vs Ajit Pawar : 'हात पाय तोडू, राज्यात फिरू देणार नाही'; मिटकरींची टीका मनसेच्या जिव्हारी

Raj Thackeray Vs Ajit Pawar : "फक्त भाषणाने पक्ष वाढला असता, तर राज ठाकरे मुख्यमंत्री असते."
Amey Khopkar, Amol Mitkari
Amey Khopkar, Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठकारे यांच्यावर टीका केली. ही टीका मनसेच्या जिव्हारी लागली असून, मिटकरींना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसेतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

मनसेचे नेते अमेय खोपकरी यांनी अमोल मिटकरींना Amol Mitkari सज्जड दम भरला आहे. आमच्या नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर हातपाय तोडू, असे म्हणत राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही खोपकरांनी दिला आहे. खोपकरांच्या धमकीच्या भाषेमुळे अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, मिटकरींनी यापूर्वीही राज ठाकरेंची मिमिक्री करून अनेकदा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

Amey Khopkar, Amol Mitkari
Nashik Political News : सरपंच, उपसरपंचासह ११ सदस्य अपात्र; अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने खळबळ

काय म्हणाले मिटकरी ?

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आढावा बैठकीत मिटकरींनी राज ठाकरे Raj Thackeray यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, पक्ष वाढवण्यासाठी भाषण महत्त्वाचे नसते, तर बूथनुसार काम करावे लागते. कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते. भाषणावर आमदार निवडून येत असते, तर आज राज ठाकरे मुख्यमंत्री असते, असे अमोल मिटकरी म्हणाले. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही कौतुक केले. दिलेल्या शब्दानुसार अजित पवारांनी मला आमदार केले. या पक्षात जाती-धर्माला अजिबात महत्त्व नाही, असेही मिटकरी म्हणाले.

खोपकरांनी दिला दम

राज ठाकरेंना मिटकरींनी लागावलेला टोला मनसेच्या जिव्हारी लागला. याला उत्तर देताना मनसे नेते अमेय खोपकरांनी मिटकरींना सज्जड दम दिला. ते म्हणाले, आमच्या नेत्याविरोधात काही बोलला तर हातपाय तोडू. अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर बोलायची लायकी नाही. पण टीव्हीवर दिसते म्हणून ते टीका करतात. आम्ही तुमच्या नेत्यांचा मान ठेवतो. आमच्या नेत्यांचा मान ठेवला गेलाच पाहिजे. मनसेत एवढी ताकद आहे, की मिटकरींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे अमेय खोपकरांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Amey Khopkar, Amol Mitkari
NEET Exam Dummy Candidates : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ घडवू पाहणाऱ्या आंतरराज्यीय फॅक्टरीचा पर्दाफाश !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com