Satej Patil : 'पढेंगे तो बढेंगे' म्हणत, सतेज पाटलाचा भलताच विश्वास; 'मविआ' 180 जागा जिंकणार

Satej Patil Predicts 180 Seats for MVA Alliance: कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप महायुतीवर टीकास्त्र सोडले.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अविश्वासविरुद्ध विश्वासाची लढाई सुरू आहे.

या मतदार संघात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचाच चेहरा विजयी होणार विश्वास व्यक्त करत भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे' या विधानावर सतेज पाटील यांनी 'पढेंगे तो बढेंगे', असा नारा दिला आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहिल्यांदा महाविकास आघाडीला (MVA) 150 ते 160 जागा येतील, असं वाटत होतं. मात्र आता त्या 180 च्या पुढे जातील, असे चित्र आहे. राज्यातील जनतेला महाविकास आघाडी हवी आहे, आता स्पष्टपणे दिसत आहे. महालक्ष्मी योजना अंतर्गत तीन हजार रुपये देणाराच आहोत. मात्र महागाई देखील आम्ही आटोक्यात आणणार आहे. शक्ती कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या संरक्षण करणार आहोत, असे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले.

Satej Patil
Solapur Shivsena : उद्धव ठाकरेंचा सोलापुरातून जाता जाता भाजपला धक्का; माजी आमदाराला पुन्हा शिवसेनेत आणले

जगातील सर्वात खोटारडा पक्ष

सतेज पाटील म्हणाले, "कर्नाटक आणि तेलंगणामध्ये महिलांना पैसे देण्याचा गणित काँग्रेसने (Congress) जमवलं आहे. त्यामुळे आम्ही पैसे कसे देणार याची काळजी त्यांना करण्याची गरज नाही. महायुतीला आमच्या योजनांची आता धास्ती वाटत आहे. कोणतीही आर्थिक शिस्त न बिघडवता कोणताही कर न वाढवता आम्ही ही योजना राबवणार आहोत". जगात सर्वात खोटे बोलणारा पक्ष कोण हे आता 'गिनीज बुक'साठी प्यारा ठेवला पाहिजे. एखाद्या राज्याबद्दल खोटी जाहिरात देत असताना इलेक्शन कमिशन त्याला परवानगी कशी देतो, असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

Satej Patil
Shahuwadi Assembly Constituency: पन्हाळा-शाहूवाडीत परिवर्तनाचा इतिहास कायम राहणार? सोयीचे राजकारण युती-आघाडीसाठी ठरतेय डोकेदुखी

महायुतीच्या खोटी जाहिरातीवर हल्लाबोल

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन खुलासा केलेला असताना, अशी जाहिरात येते कशी? खोटी जाहिरात देऊन मत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न होता, मात्र तो यशस्वी होणार नाही. जातीय तेढ निर्माण करणारे विधाने त्यांना आता का करावी लागत आहेत? मला कळत नाही. समाजात दुही निर्माण करून मत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्याला यश येणार नाही', असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात 35 ठिकाणी पदयात्रा आणि रॅली

ठाकरे यांनी ट्विट केलेला व्हिडिओ नॅचरल वाटतो भाजपनेकडून आलेला हिडिओ तयार केलेला वाटतोय. दोन दिवसात महायुतीकडून, असा व्हिडिओ येईल हे मी आधीच सांगितलं होतं. असे सांगत राहुल गांधी कोल्हापूर मध्ये याव्यात, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधी, कन्हैया कुमार देखील प्रचारासाठी कोल्हापुरात येतील. राज्यात 35 ठिकाणी पदयात्रा आणि रॅली निघणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली. अमित शहा यांच्या फोटोमुळे मतं कमी होणार आहेत. असा फिडबॅक महायुतीला गेला असेल म्हणून त्यांनी फोटो काढून टाकला असेल, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com