Shahuwadi Assembly Constituency: पन्हाळा-शाहूवाडीत परिवर्तनाचा इतिहास कायम राहणार? सोयीचे राजकारण युती-आघाडीसाठी ठरतेय डोकेदुखी

Constituency’s history of power shifts every election: प्रत्येक निवडणुकीत दर पाच वर्षांनी सत्ता बदल या मतदारसंघात होत असतो. यंदा मात्र त्याला फाटा मिळणार? की ही परंपरा कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Satyajeet Patil Sarudkar, vinay kore
Satyajeet Patil Sarudkar, vinay koreSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 22 हजाराचे मताधिक्य असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. नेहमीप्रमाणे शिवसेना आणि जनसुराज्य शक्तीमध्ये पुन्हा एकदा शाहुवाडी पन्हाळा या मतदारसंघात लढत होत आहे. महायुतीकडून जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे विरुद्ध महाविकास आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांच्यात सामना रंगला आहे. त्यांच्यासोबत 14 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक निवडणुकीत दर पाच वर्षांनी सत्ता बदल या मतदारसंघात आहे. यंदा मात्र त्याला फाटा मिळणार? की ही परंपरा कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पाच वर्षात मतदारसंघात केलेली विकास कामे आणि मागील अडीच वर्षात सत्तेत आल्यानंतर पन्हाळा शाहूवाडी (Shahuwadi) मतदारसंघात झपाट्याने झालेली विकास कामे यांच्या जोरावरचं आमदार विनय कोरे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. तर महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर(Satyajeet Patil Sarudkar) यांनी पुन्हा एकदा पन्हाळा शाहूवाडी मधून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

Satyajeet Patil Sarudkar, vinay kore
PM Modi Solapur Tour : ‘महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे महायुतीचा ट्रॅक रेकॉर्ड Vs महाआघाडीचा खोटा ट्रॅप रेकॉर्ड’

14 उमेदवार रिंगणात असले तरी सरूडकर विरुद्ध कोरे असंच मैदान गाजणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे स्थानिक नेते कोरे यांच्या गोठात दाखल झाल्याने त्यांचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य विधानसभेचे गणित जुळवणार का हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

खासदार धैर्यशील माने, काँग्रेसचे अमर पाटील, कर्णसिंह गायकवाड यांच्यासह सर्जेराव पाटील-पेरीडकर यांची साथ विनय कोरे यांना आहे. तर सत्यजित पाटील सरूडकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि महायुती (mahayuti) मधील काही नाराज घटक बाजूने आहेत. शिवाय शाहूवाडी व पन्हाळ्यामधून मानासिंग गायकवाड, शेकापचे भारत पाटील यांची साथ त्यांना आहे. त्यामुळे सेनेची मशाल मतदार यावेळी हाती घेतील, असा विश्वास या गटाकडून व्यक्त होतो आहे.

Satyajeet Patil Sarudkar, vinay kore
Keda Aher Politics: दहा संचालक विधानसभेचे उमेदवार; आजारी जिल्हा बँकेविषयी निवडणुकीत मौन!

पन्हाळा शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. जिल्ह्यातील सहकारवर अवलंबून असणाऱ्या राज्यकर्त्यांना गोकुळ दूध संघ, जिल्हा सहकारी बँक, शिवाय जिल्हा परिषदेवर जाण्याची इच्छा असल्याने पक्षीय राजकारणाला फाटा देत स्थानिक पातळीवर सोईस्कर भूमिका घेतली आहे. स्थानिक गटावरच या मतदारसंघातील उमेदवारांची विजयाची बांधणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com