Dharmraj Kadadi : धर्मराज काडादी निवडणूक लढविणार की थांबणार?; काँग्रेसच्या मुलाखतींकडे पाठ

South Solapur Constituency : काडादी यांनी राष्ट्रवादीच्या मुलाखतीला हजेरी लावल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, ते ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तो दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे.
Dharmraj Kadadi
Dharmraj KadadiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 October : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मात्र, ज्या काँग्रेसकडे दक्षिण सोलापूर मतदारसंघ आहे, त्या काँग्रेसच्या मुलाखतींकडे काडादी यांनी पाठ फिरवली, त्यामुळे काडादी विधानसभेची निवडणूक लढवणार की थांबणार, याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून मुलाखती आणि उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काही दिवसांपूर्वी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी हजेरी लावली होती.

काडादी यांनी राष्ट्रवादीच्या () मुलाखतीला हजेरी लावल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, ते ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तो दक्षिण सोलापूर मतदारसंघ (South Solapur Constituency) हा काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून काडादी यांनी मात्र राष्ट्रवादीकडे मुलाखत दिली आहे.

Dharmraj Kadadi
Pune Congress : पुण्यातील काँग्रेस इच्छुकांचे भवितव्य ठाकूरांच्या हाती!

राष्ट्रवादीच्या मुलाखतीनंतर काही दिवसांतच काँग्रेस पक्षाच्या मुलाखती लातूरचे खासदार शिवाजीराव काळंगे यांनी घेतल्या. त्या मुलाखतीकडे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी पाठ फिरवली. आता त्यांनी काँग्रेसच्या मुलाखतींकडे पाठ फिरवल्याने दक्षिण सोलापूरमधून त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार का हा खरा प्रश्न आहे. काडादी हे उमेदवार नसतील तर काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, हा खरा प्रश्न आहे.

महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूर मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो, त्या पक्षाकडून काडादी यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी एक चर्चा आहे. मात्र, काडादी यांनी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतींकडेच पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Dharmraj Kadadi
Haryana Assembly Election : हरियाणा निवडणुकीचा भाजपचा खर्च एकनाथ शिंदेंनी केला; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान धर्मराज काडादी यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण सोलापूर मतदारसंघात गावभेट दौराही केला होता. त्या दौऱ्यात काडादी यांना उसाच्या बिलावरून काही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. मात्र, ज्या मतदारसंघातून काडादी विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत, त्या मतदासंघात कोणालाही उमेदवारी दिली तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काडादी हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार की थांंबवणार याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com