Satara : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या 5 ते 6 महिन्यांवर येऊन ठेपल्या होत्या.त्या निवडणुकांकडे लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिले जात असल्यामुळे या 5 राज्यांच्या निवडणुका भाजपसह काँग्रेसनेही प्रतिष्ठेच्या केल्या होत्या.त्यात आता मध्य प्रदेशमध्ये पुन्हा भाजप दीडशे पार केले आहे तर राजस्थानमध्ये शतक पार केले असून छत्तीसगडमध्येही सत्तेच्या जवळ पोहचले आहे.
तर तेलंगणातही भाजपला (BJP) अपेक्षेपेक्षा जास्त यश भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.हा निकाल मोदींविरोधात एकवटलेल्या इंडिया आघाडीसाठी धोक्याची घंटा दर्शवणारा आहे.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच राज्यांच्या निकालावर मोठं विधान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी सातारा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.या पत्रकार परिषदेत पवार यांनी विविध राजकीय घडामोडींसह पाच राज्यांच्या विधानसभा निकालावरही प्रतिक्रिया दिली आहे.पवार म्हणाले,परंतू,या चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकालाचे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.यानंतरच या निकालांवर भाष्य करणं अधिक योग्य राहील असेही पवारांनी यावेळी सांगितले.
पवार म्हणाले, यापेक्षा वेगळा निकाल लागला माहिती आमच्याकडे नव्हती.दोन राज्यांत भाजपची सत्ता होती.तिथं त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं.मुख्यत:राजस्थानचा मुद्दा आहे.मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो.त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल दिसतो आहे असेही पवारांनी यावेळी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पवार म्हणाले, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र आजच्या निकालाचा परिणाम 2024 मध्ये होणार नाही.महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही,असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.तसेच सध्या तरी मोदींना अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले.
मध्य प्रदेशात दोन्ही राज्यांमध्ये भाजपने प्रचारादरम्यान राम मंदिराचा मुद्दा जोरकसपणे मांडला. याचाच फायदा झालेला दिसून येत असून मध्यप्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारली.230 जागांपैकी भाजपने तब्बल 162 जागांवर आघाडीवर आह.काँग्रेस (Congress) ला केवळ 66 जागांवर आघाडी मिळाली आहे.तर राजस्थानमध्ये सुध्दा भाजपने काँग्रेसचा पुन्हा सत्तेत परतणार असल्याचा दावा फोल ठरवला आहे. त्यात 130 जागावंर भाजप आघाडीवर,काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.