Ajit Pawar: अजितदादा, तुम्ही काय दिवे लावलेत ? संतप्त संशोधक विद्यार्थ्यांचा सवाल

Maharashtra Assembly Winter Session: पीएच.डी करून काय दिवे लावणार ? असे धक्कादायक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.
Ph.D Students and Ajit Pawar
Ph.D Students and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच.डी धारक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या विचारलेल्या प्रश्नावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील पीएच.डी धारक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडात असे शब्द शोभत नाहीत, आतापर्यंत ज्या महापुरुषांनी पीएच.डी केली त्यांचा अपमान अजित पवार यांनी केला असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रतिक्रिया पीएच.डी धारक विद्यार्थ्यांकडून उमटत आहेत.

आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंगळवारी पीएच.डी धारक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना "पीएच.डी करून काय दिवे लावणार ?", असे धक्कादायक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.

या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या बद्दल नाराजी बोलून दाखवली. आज विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अजित पवार यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ph.D Students and Ajit Pawar
Nagpur Winter Session: 'ऑपरेशन सक्सेस, पेशंट डाईड'; आमदार कानडेंची 'जलजीवन'च्या अंमलबजावणीवर टीका

भारतीय विकासाचा मुद्दा हा संशोधनातून समोर येत असतो. संशोधनामुळेच भारताच्या विकासात महत्त्वाचे ठरत आहे. आजपर्यंत अनेक महापुरुषांनी पीएच.डी केली आहे, त्यांच्या संशोधनातूनच भारताची वाटचाल सुरू आहे. अशा थोर पुरुषांचा अपमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आतापर्यंत तुम्ही दोन ते तीन वेळा उपमुख्यमंत्री झाला. या सर्व काळात तुम्ही काय दिवे लावले, याची महाराष्ट्राला जाण आहे. केलेल्या विधानाबाबत माफी मागावी, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. पीएच.डी धारक विद्यार्थ्यांचा अपमान अजित पवार यांनी केला असून कोल्हापूर दौऱ्यात त्यांना आम्ही दाखवून देऊ, शिवाय सरसकट फेलोशिप त्यांनी पीएच.डी धारक विद्यार्थ्यांना द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

(Edited by- Ganesh Thombare)

Ph.D Students and Ajit Pawar
Sanjay Raut On Ajit Pawar: प्रफुल पटेलांना वाचवण्यासाठी 'दादां'ची सारवासारव; संजय राऊतांचा निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com