मोठा गाजावाजा करूनही अवघे तीनच पदाधिकारी लागले सावंतांच्या गळाला!

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील कोणीही आज शिंदे गटात सामील झाले नाहीत, त्यामुळे शिंदे गटाला माळशिरसमध्ये शिरकावाची संधी मिळते की नाही, याची चर्चा आज रंगली होती.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

नातेपुते (जि. सोलापूर) : मोठा गाजावाजा करूनही माळशिरस तालुक्यात आज (ता. ५ सप्टेंबर) तिघांशिवाय एकही मोठा पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाच्या अर्थात आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गळाला लागला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील कोणीही आज शिंदे गटात सामील झाले नाहीत, त्यामुळे शिंदे गटाला माळशिरसमध्ये शिरकावाची संधी मिळते की नाही, याची चर्चा आज रंगली होती. (At Natepute, only three entered the Shinde group)

आरोग्य मंत्री झाल्यानंतर तानाजी सावंत यांचा आजचा पहिलाच सोलापूर दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथून झाली. ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात मंत्री तानाजी सावंत, आमदार राम सातपुते, प्रा. शिवाजी सावंत आणि इतर मान्यवरांचे शिंदे गटाच्या वतीने स्वागत करण्यात आले. राष्ट्रपुरुषाच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राजकुमार हिवरकर यांनी आयोजित केलेल्या समारंभात सावंत यांनी उपस्थिती लावली. या वेळी शिंदे गटाच्या शिवसेना फलकाचे आणि कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.

Tanaji Sawant
तानाजी सावंत गेलेल्या मार्गाचे शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण

दरम्यान, सावंत यांच्या दौऱ्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. या वेळी सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील सुमारे एक हजार कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आज नातेपुते येथेच शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाल. या ठिकाणी केवळ तिघांनीच शिंदे गटात जाणे पसंत केल्याचे दिसून आले.

Tanaji Sawant
शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार; शेतीला मोफत वीज देणार : राहुल गांधींची घोषणा

प्रत्यक्षात नातेपुते येथे अनेक मोठे पदाधिकारी जाणार असल्याचा दावा काला शिंदे गटाकडून करण्यात आला होता. तसेच नावाबाबत उद्या सांगण्यात येईल, असेही काल कळविण्यात आले होते. मात्र, आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकही मोठा पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे शिंदे गटाला माळशिरस तालुक्यात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tanaji Sawant
'सत्तांतर होऊनही त्यांच्या डोक्यातील हवा अजून गेली नाही; ऑपरेशन करावे लागेल'

आमदार राम सातपुते यांच्याविषयी तानाजी सावंत म्हणाले, माळशिरस तालुक्यातील जनता गौरवास पात्र आहे, कारण आमदार राम सातपुते विद्यार्थिदशेपासून संघर्षशील नेतृत्व आहे. संघर्ष करणारा, त्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध असणारा आमदार तुम्ही निवडून दिला आहे. मी किंवा राम सातपुते आमदार किंवा मंत्री नसून सेवक आहोत, असे सांगून आमदारांनी रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास आठवड्याला भेट देऊन सांगितलेली कामे झालेत का नाहीत, ते मला फोनवरून सांगावे, असे आवाहनही सावंत यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com