विवाह सोहळ्यात मुरकुटे मामा, आदिक झाल्या बहीण, घोलप, कांबळेंनी धरला अंतरपाट

सामूहिक विवाह सोहळा आगळावेगळा ठरला.
The wedding ceremony
The wedding ceremonySarkarnama

महेश माळवे

Shrirampur : वरपक्षाकडून मामा झालेले माजी आमदार भानुदास मुरकुटे, वधूकडून बहिणीची भूमिका पार पाडणाऱ्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक ( Anuradha Adik ), सोबतीला माजी मंत्री बबनराव घोलप व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आंतरपाट धरत पार पाडलेला येथील सामूहिक विवाह सोहळा आगळावेगळा ठरला.

येथील माजी नगरसेवक मुख्तार शाह यांच्या गरीब नवाज फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे, पालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. पाहुणे म्हणून माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक उपस्थित होत्या. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाह यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना वधू व वरांकडील पाहुणे म्हणून उभे राहण्याची विनंती केली.

The wedding ceremony
श्रीरामपूरमध्ये राजकीय फराळ : ससाणेकडे मुरकुटे, आदिकांकडे कानडे यांची हजेरी

यावेळी मुरकुटे हे वरपक्षाकडून मामाची भूमिका पार पाडण्यासाठी वरांच्या मागे उभे राहिले, तर माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी वधूपक्षाकडून वधूच्या बहिणीची भूमिका निभावली. वधू-वरांच्या मध्ये घोलप व कांबळे यांनी अंतरपाट धरला. या राजकीय पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा यथासांग पार पडला. आगळ्यावेगळ्या पाहुण्यांमुळे या सामुदायिक सोहळ्याला रुपेरी साज चढला होता. मंडपात उपस्थित वधू-वरांकडील वऱ्हाडी मंडळींनी हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठविला.

पालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मुरकुटे हे आदिक यांच्या पाठीशी उभे होते. मात्र, नंतर राजकीय मतभेद झाल्याने दोघे एकमेकांचे विरोधक बनले. अशोक कारखान्याच्या निवडणुकीत अनुराधा आदिक यांनी शेतकरी संघटनेने उभ्या केलेल्या पॅनलची साथ केली. त्यामुळे आज पार पडलेल्या विवाह सोहळ्यात भूमिका वेगळी असली, तरी ते एकमेकांच्या विरोधात उभे होते. मात्र, हा समारंभ राजकीय विरोधाचा नव्हे, तर दोन नववधू-वरांच्या मनोमीलनाचा होता.

The wedding ceremony
भानुदास मुरकुटे म्हणाले, विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही...

विधायक कामासाठी एकत्र

ज्याप्रमाणे राजकीय विरोधक असतानाही विधायक कामासाठी कोणतीही आडकाठी आणली जात नाही, त्याच पद्धतीने, विवाहबद्ध झालेल्या या नवदाम्पत्यांना पुढील वाटचालीसाठी या मान्यवरांनी आपले आशीर्वाद देत सोहळा दिमाखदार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com