Satara Loksabha : 'शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी, तुम्हाला का नाही', उदयनराजेंनीच सांगितलं कारण

Udayanraje Bhosale News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवारी असतील मात्र त्यांची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही.
Satara Loksabha  : 'शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी, तुम्हाला का नाही', उदयनराजेंनीच सांगितलं कारण
Published on
Updated on

हेमंत पवार

Satara Political News : महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी घोषित केली. तर, साताऱ्यामधून महायुतीचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले उदयनराजे भोसले यांचे नाव अजुनही उमेदवारांच्या यादीत नाही. यावर थेट उदयनराजे भोसले यांनीच उत्तर दिले आहे.

कोल्हापुरच्या शाहु महाराजांच्या उमेदवारीबद्दल मी त्यांचे स्वागतच करतो. मला लवकर उमेदवारी दिली नाही. यात वाईट मानायचे काहीच कारण नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत थोडं पुढे-मागे होतं. ज्यावेळेस चर्चा होते. त्या चर्चेतुनच काहीतरी चांगल घडतं, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

Satara Loksabha  : 'शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी, तुम्हाला का नाही', उदयनराजेंनीच सांगितलं कारण
Narendra Modi Speech : 'काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण संपवलं', नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवारी असतील मात्र त्यांची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही. मात्र, उदयनराजेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) भाष्य केले आहे.

महाविकास आघाडीचा (mahavikasaghadi) उमेदवार जाहीर झाला असेल तर त्यांनी त्यांची तयारी करावी. आमची तर तयारी झालीच आहे. लोकांच्या मनात काय आहे ? हे लोकं ठरवतील. एखाद्या माणसाचे कॅरेक्टर बघायचे असेल तर त्यांनी `15-20 वर्षांच्या कालावधीत वैयक्तिक वाटचाल कशी केली, हे पहावे. त्यातून त्यांच्याकडुन समाजसेवा किती घडली आणि काय घडली ? हे समजेल. नाव ठेवणे हे मी कधी करत नाही. बऱ्याचशा गोष्टी आज बोलण्यापेक्षा लवकरच त्या उघडकीस येतील, असे सुचक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे भोसले म्हणाले, लोकसभेचा उमेदवार म्हणुनच मी संवाद साधत आहे. भाजप निश्चीतपणे निर्णय घेईल. काही अडचणी असतात. सातारा हा नेहमी राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदु असतो. या सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. लहान लग्नाच्या याद्या करणे सोपे असते. हे मोठं लग्न आहे.

(Edited By Roshan More)

Satara Loksabha  : 'शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी, तुम्हाला का नाही', उदयनराजेंनीच सांगितलं कारण
Raj Thackeray News : मनसैनिकांचे 'कन्फ्यूजन पे कन्फ्यूजन'; राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेने कोंडी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com