Satara Lok Sabha Constituency : 'सातारा लोकसभेचा खासदार जातीयवादी पक्षांच्या विचाराचा होऊ देणार नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, तेव्हा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या योजना कॉंग्रेसच्या काळात का राबवल्या गेल्या नाहीत? हे सांगावे. असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी टीकेला प्रत्युत्तर दिलंं.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क दौऱ्यादरम्यान, उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान ते बोलत होते. सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे भरत पाटील, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, पैलवान धनाजी पाटील, सुनिल काटकर आदी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी नसताना कृष्णा खोरे विकास महामंडळाचा प्रकल्प मी मंजुर केला.' असे सांगुन उदयनराजे भोसले म्हणाले, 'त्या योजनेद्वारे दुष्काळी भागाला पाणी मिळाले, जसा विश्वास निर्माण झाला तसा ठिकठिकाणी परिवर्तन झालेले पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसच्या काळात एवढा उतमात झाला होता की मला त्याचे नवल वाटायचे. कॉंग्रेसवाले दगडाला शेंदुर जरी फासला तरी लोक निवडून देतील असे म्हणत होते. कॉंग्रेसच्या ज्या नेत्याने भाजप(BJP) या जातीयवादी पक्षाचा खासदार होऊ देणार नाही, असे विधान केले असेल त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या काळात कृष्णा खोरे सारखा प्रकल्प का राबवला नाही? हे जाहीर करावे.'
सहकारी तत्वावर स्थापन झालेले कारखाने ही सर्वसामान्यांचे हीत समोर ठेवून सुरु झालेले आहेत. वसंततदादा पाटील आणि अनेक दिग्गजांच्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली आहे, असे उदयनराजेंनी सांगितले. कॉंग्रेसच्या काळात खिरापत वाटल्यासारखे कारखान्यांना परवाने दिले जात होते, असे सांगुन खासदार भोसले यांनी जरंडेश्वर कारखान्यामध्ये गलथान कारभार झाल्यामुळे सहकारी तत्वावरील खासगीकरण करण्यात आले. मी खासगीकरणाचे समर्थन करत नाही. असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणप्रश्नी उदयनराजे म्हणाले, जातीनिहाय जनगणना शासनाने करणे गरजेचे आहे. मात्र, 20 वर्षे झाली ती झालेली नाही. 23 मार्च 1994चे नोटीफीकेशन आहे. त्यावर आरक्षण देण्यात आले. त्या-त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी पुढे त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार करायला हवा होता. मी सर्वच समाजाचे समर्थन करतो. कोणत्याही जातीधर्मातील तरुण असल्यावर त्यांना 'इकॉनॉमिकली बॅकवर्ड' म्हटल्यावर त्याला सर्व सोयी लागू होतात. अनेक गरीब लोक मराठा समाजात आहेत. मुलांना फी भरायला पैसे नसतात, त्यावेळी त्या लोकांना काय वाटत असेल?, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.