Raju Dindorle : मनसेच्या जिल्हाध्यक्षावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, बँकेच्या संचालकांना केली मारहाण

Atrocity case filed Shubham deshmukh against MNS district president Raju Dindorle : सहकारी संस्था असलेल्या बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
Raju Dindorle
Raju DindorleRaju Dindorle
Published on
Updated on

Kolhapur bank manager beaten up kolhapuri : कोल्हापूर जिल्ह्यातील मनसे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारी संस्था असलेल्या बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक असलेले दिंडोर्ले यांच्यासह सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी 5 ऑगष्ट रोजी रंकाळा परिसरात असणाऱ्या श्री साईदर्शन जनता अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी येथील मुख्य शाखेत मनसेचे (MNS) जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, समर्थ कशाळकर, प्रसाद पाटील विकास कांबळे यांच्यासह अनोखी चार ते पाच इसमाने बँकेच्या केबिनमध्ये जाऊन बँकेचे अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

Raju Dindorle
Kolhapur Politics : होय आम्ही केले! विधानसभेच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी पक्षांसोबत नेत्यांनीही थोपटले दंड

यावेळी आरोपी यांनी फिर्यादीकडून जबरस्तीने पैसे उकळण्याच्या उद्देशाने ही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच अश्लील शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देवून कंबरेच्या पट्याने तसेच हातात मिळेल त्या वस्तुने मारहाण केली. जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी अपमान केल्याचे तक्रारीत उल्लेख आहे. दरम्यान संबंधित संशयीतांनी संस्थेमधील 'सीसीटीव्ही'चा डीव्हीआर जबरदस्तीने घेवून गेले. दरम्यान या तक्रारीनुसार कोल्हापूर लक्ष्मीपुरी पोलीसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. या चौकांनाही लक्ष्मीपुरी पोलिसांनी(Police) अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Raju Dindorle
Kolhapur Politics : होय आम्ही केले! विधानसभेच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी पक्षांसोबत नेत्यांनीही थोपटले दंड

त्यांच्याविरोधात 20024/329 भा.न्या. स. २०२३ चे कलम ३१० (२) , ३५१(२) , ३५२, ३२४ (४), १२७(२) अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ६ सह सुधारित अधिनियम २०१५ चे कलम ३१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याबाबतची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शुभम कृष्णात देशमुख (रां. एकोंडी ता. कागल) यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com