Ganpatrao Deshmukh House Attack : माजी आमदार (स्व) गणपतराव देशमुखांच्या घरावर हल्ला; सांगोल्यात खळबळ

Sangola News : शेकाप नेते माजी आमदार (स्व.) भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला झाला. या घटनेच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने सांगोला बंदची घोषणा केली.
Ganpatrao Deshmukh House Attack
Ganpatrao Deshmukh House Attack Sarkarnama
Published on
Updated on
  1. सांगोल्यात माजी आमदार (स्व.) भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञातांकडून बाटली फेकण्याचा हल्ला झाला असून शहरात खळबळ उडाली आहे.

  2. या घटनेनंतर शेतकरी कामगार पक्षाने निषेधार्थ ‘सांगोला बंद’ची घोषणा केली आहे.

  3. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई व अटक करण्याची मागणी तहसीलदार आणि पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Solapur, 10 October : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार (स्व.) भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर आज (ता. १० ऑक्टोबर) अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे सांगोल्यात एकच खळबळ उडाली असून शेतकरी कामगार पक्षाने या हल्याच्या निषेधार्थ उद्या (ता. ११ ऑक्टोबर) ‘सांगोला बंद’ची हाक दिली आहे.

सांगोल्यात आज शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. त्या प्रवेशापूर्वी अज्ञातांनी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर बाटली फेकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गणपतआबांच्या घरी सध्या त्यांचे नातू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख राहत आहेत. एकीकडे सांगोला शहरात भाजप पक्षप्रवेश होणार होता, त्या वेळीच सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपराव देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे. हा हल्ला का करण्यात आला. त्यामागे कोण आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, सांगोला शहरात (स्व.) गणपराव देशमुख यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे व सांगोला पोलिस ठाण्याचे काशीद यांना निवेदन देण्यात आले आहे. या हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Ganpatrao Deshmukh House Attack
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंनी घेतली पालकमंत्री गोरेंची भेट; ‘तुम्ही पालकमंत्री आहात, आमच्यावर नव्हे, सोलापूरच्या जनतेवर अन्याय करू नका’

दरम्यान, गणपराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्याचा सांगोला शहर व तालुक्यातील जनतेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून उद्या शनिवारी सांगोला बंदची हाक देण्यात आलेली आहे.

Ganpatrao Deshmukh House Attack
Sabhapati Aarakshan : पंचायत समिती सभापतिपद आरक्षण : माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूरचे सभापतिपद खुले; महिलांना सहा ठिकाणी संधी

प्रश्न 1 : सांगोला येथे कोणाच्या घरावर हल्ला झाला?
माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला झाला.

प्रश्न 2 : हल्ल्याच्या निषेधार्थ काय निर्णय घेण्यात आला?
शेतकरी कामगार पक्षाने ‘सांगोला बंद’ची हाक दिली आहे.

प्रश्न 3 : हल्ला कधी आणि कसा झाला?
१० ऑक्टोबर रोजी अज्ञातांनी बाटली फेकून हा हल्ला केला.

प्रश्न 4 : पक्षाने प्रशासनाकडे कोणती मागणी केली?
हल्लेखोरांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com