Sabhapati Aarakshan : पंचायत समिती सभापतिपद आरक्षण : माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूरचे सभापतिपद खुले; महिलांना सहा ठिकाणी संधी

Solapur District Panchayat Samiti Election 2025 : सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांपैकी सहा सभापतीपद महिला राखीव तर माढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर खुले राहणार आहेत. ओबीसी आणि कुणबी मराठा आरक्षणावर स्पर्धा अपेक्षित आहे.
Solapur District  Panchayat Samiti
Solapur District Panchayat Samiti Sarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, महिलांसाठी ५० टक्के (६ सभापतिपदे) राखीव ठेवण्यात आली आहेत.

  2. माढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या तीन पंचायत समित्यांचे सभापतीपद सर्वसाधारण (खुले) राहणार आहे.

  3. आरक्षणानंतर आता गट आणि गण आरक्षणाकडे तसेच पक्षीय मोर्चेबांधणीच्या तयारीकडे सर्वांचे लक्ष वळले आहे.

Solapur, 10 October : सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के म्हणजेच सहा पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित झाले आहे. जिल्ह्यातील केवळ माढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर पंचायत समित्यांचे सभापतीपद खुले असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक चुरस असणार आहे. याशिवाय कुणबी मराठा प्रमाणपत्रामुळे ओबीसींच्या जागेवर स्पर्धा दिसणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने कामाला सुरुवात केली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण यापूर्वी जाहीर झाले आहे. त्या ठिकाणी निराशा झालेल्या इच्छुकांचे लक्ष पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या (Panchayat Samiti Sabhapati) आरक्षणाकडे लागले होते.

सोलापूरच्या (Solapur) नियोजन भवनात जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण काढण्यात आले, त्यानुसार जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांचे सभापतिपद हे खुले (सर्वसाधारण प्रवर्ग) असणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तीन पंचायत समित्यांचे सभातिपद आरक्षित असणार आहे. तीन पंचायत समित्यांवर ओबीसींना, तर दोन ठिकाण अनुसूचित जाती प्रवर्गाला संधी मिळणार आहे.

Solapur District  Panchayat Samiti
Baliram Sathe : शरद पवारांना सोलापुरात मोठा धक्का; शब्द देऊनही पुनर्वसन होत नसल्याने निष्ठावंत बळीराम साठेंचा राष्ट्रवादीला रामराम....

सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांचे गणाच्या आरक्षणाचे सर्वांचे लक्ष असणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांपाठोपाठ आता पंचायत समित्यांच्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. तसेच, राजकीय पक्षांकडूनही तयारीला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्या आणि सभापतिपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे :

अक्कलकोट- ओबीसी महिला

बार्शी - सर्वसाधारण महिला

सांगोला- सर्वसाधारण महिला

करमाळा - ओबीसी महिला

माढा - सर्वसाधारण

पंढरपूर - अनुसूचित जाती सर्वसाधारण

माळशिरस- सर्वसाधारण

मंगळवेढा - सर्वसाधारण महिला

मोहोळ - ओबीसी सर्वसाधारण

दक्षिण सोलापूर - सर्वसाधारण

उत्तर सोलापूर - अनुसूचित जाती (महिला)

Solapur District  Panchayat Samiti
Thane Municipal Corporation: बढती मिळूनही 'मलिदा' विभाग सोडवेना, माजी नगरसेवकाचे महापालिका आयुक्तांना पत्र

प्रश्न 1 : सोलापूर जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर झाले?
एकूण ११ पंचायत समित्यांचे सभापतीपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

प्रश्न 2 : महिलांसाठी किती सभापतिपदे राखीव आहेत?
सहा पंचायत समित्यांचे सभापतिपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

प्रश्न 3 : खुले प्रवर्ग कोणत्या पंचायत समित्यांना मिळाले?
माढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या पंचायत समित्यांना खुले प्रवर्ग देण्यात आला आहे.

प्रश्न 4 : ओबीसी आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कोणत्या पंचायत समित्या आरक्षित आहेत?
ओबीसी: अक्कलकोट (महिला), करमाळा (सर्वसाधारण), मोहोळ (महिला)

  1. अनुसूचित जाती: पंढरपूर (सर्वसाधारण), उत्तर सोलापूर (महिला)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com