Praniti Shinde : प्रणिती शिंदेंनी घेतली पालकमंत्री गोरेंची भेट; ‘तुम्ही पालकमंत्री आहात, आमच्यावर नव्हे, सोलापूरच्या जनतेवर अन्याय करू नका’

Solapur Political News : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी निधीच्या असमतोल वाटपावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. निधी वाटप सुरू असल्याचे स्पष्टीकरण गोरे यांनी दिले.
Praniti Shinde-Jaykumar Gore
Praniti Shinde-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on
  1. खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधील निधीच्या असमतोल वाटपाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निषेध नोंदवला.

  2. शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याचा आरोप केला, तर गोरे यांनी डीपीडीसी निधी वाटप अद्याप सुरू असल्याचे सांगत अन्याय झालेला नसल्याचे उत्तर दिले.

  3. काँग्रेसकडून सर्व पक्षांना समान निधी द्यावा अशी मागणी झाली, तर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महाआघाडी सरकारच्या काळात निधी न मिळाल्याची आठवण करून दिली.

Solapur, 10 October : सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी निधीच्या असमतोल वाटपावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळत नाही, अशी तक्रार खासदार शिंदे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर तुमच्यावर अन्याय झाला, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण डीपीसीच्या निधी वाटपाचे काम अजून सुरू आहे, असे उत्तर गोरे यांनी दिले.

खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निधीबाबत गाऱ्हाणे मांडले. त्यात सोलापूर महापालिकेत विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना अत्यंत कमी प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. आपण पालकमंत्री या नात्याने सरसकट सर्वांना पारदर्शीपणे निधी द्यावा. आम्ही आमच्या स्वतः साठी नाही तर सोलापूरच्या लोकांसाठी निधी मागत आहोत. आपण पालकमंत्री म्हणून हा अन्याय आमच्यावर नव्हे तर सोलापूरच्या जनतेवर करू नये, अशी विनंती प्रणिती शिंदे यांनी केली.

ज्या प्रमाणे आमदारांना निधी मिळतो, तसा खासदाराला निधी मिळावा. हे आतापर्यंत सोलापूरमध्ये (Solapur) झाले आहे. पालकमंत्री कोणी असले तरी सर्वांना निधी मिळालेला आहे. पण त्याच्यात तफावत वाटत आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आहोत. त्याम माजी महापौर, नगरसेवक, स्टॅडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. महापालिकेच्या निधी वाटपात आमच्यावर अन्याय झालेला आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.

भाजपमध्ये प्रवेश करा मग निधी देतो, असं पक्षपाती न वागता सर्वांना निधी मिळावा. आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्यामुळे सर्वांना समान निधी मिळावा, अशी आमची मागणी आहे, असे काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले..

Praniti Shinde-Jaykumar Gore
Sabhapati Aarakshan : पंचायत समिती सभापतिपद आरक्षण : माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूरचे सभापतिपद खुले; महिलांना सहा ठिकाणी संधी

प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला पालकमंत्री गोरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, जो अन्याय झाला नाही, त्यासंदर्भात तुम्ही अन्याय म्हणण्याचे काही कारण नाही. कारण, डीपीडीसीच्या निधी वाटपाचे काम अजून चालू आहे. तो निधी वाटून अजून संपलेला नाही. आपल्यावर अन्याय झाला आहे, असं म्हणणंच मुळात चुकीचे आहे.

तुम्ही आम्ही मिळून आपण महाराष्ट्राचे, सोलापूरचे नागरिक आहोत. तुम्ही आम्ही हा विषय वेगळा आहे, असे उत्तर पालकमंंत्री जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

महाआघाडीच्या काळात एक रुपायाही मिळाला नाही : सचिन कल्याणशेट्टी

दरम्यान, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मला एक रुपयादेखील निधी मिळाला नाही, असे सांगून त्यावेळीही निधी मिळत नव्हता, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

Praniti Shinde-Jaykumar Gore
Baliram Sathe : शरद पवारांना सोलापुरात मोठा धक्का; शब्द देऊनही पुनर्वसन होत नसल्याने निष्ठावंत बळीराम साठेंचा राष्ट्रवादीला रामराम....

प्रश्न 1 : प्रणिती शिंदे यांनी कोणत्या विषयावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली?
सोलापूरमधील डीपीडीसी निधीच्या असमतोल वाटपाबाबत तक्रार करण्यासाठी.

प्रश्न 2 : पालकमंत्री गोरे यांनी या तक्रारीवर काय उत्तर दिले?
निधी वाटपाचे काम अजून सुरू आहे आणि अन्याय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रश्न 3 : काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काय मागणी केली?
सर्व पक्षांना पारदर्शकपणे आणि समान निधी द्यावा, अशी मागणी केली.

प्रश्न 4 : भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काय आरोप केला?
महाविकास आघाडीच्या काळात एक रुपयाही निधी मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com