Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे शेतकऱ्यांना म्हणाले, "तर मी यंदा दिवाळी करणार नाही..."

Crop Insurance Compensation : तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका,
Published on

Beed News : अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही म्हणून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. त्याला मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. "मीदेखील शेतकऱ्याचा पोरगा आहे.

शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे मला चांगलं माहीत आहे. येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अग्रिम जमा केली जाणार आहे. जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अग्रिम जमा नाही झाले, तर मीदेखील माझ्या घरात दिवाळी करणार नाही," असा शब्द राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

मुंडे म्हणाले, "आज जर शेतकरी संकटात असेल, तर कृषिमंत्री म्हणून मी दिवाळी कशी साजरी करणार ? कोणी वेगवेगळे प्रचार करतील, मोठमोठ्या सभेतून आरोप करतील, काय झालं पीकविम्याचे ? असं म्हणतील मात्र तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका," ते बीडमध्ये बोलत होते.

Dhananjay Munde
Kapil Patil News : भाजपला गाडण्याची ताकद कोणामध्येही नाही; कपिल पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

"१९९८ ला जर कोणी पीकविमाबाबत सांगितले असेल, तर अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमोर माझे वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासमोर पीकविमाबाबत सांगितलं होते. त्यानंतर पीकविमा लागू झाला. सध्याच्या पीकविम्याबाबत येणाऱ्या मंत्रिमंडळात अंतिम निर्णय होणार आहे," असे मुंडे म्हणाले.

पीकविम्यासंदर्भातील अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांची नुकतीच बैठक झाली. विमा कंपन्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड व ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी नगरमध्ये काही दिवसांपूर्वी दिली.

Dhananjay Munde
Maratha Kranti Morcha : सदाभाऊंचा डीएनए चेक करण्याची वेळ आली; खोतांवर मराठा ठोक क्रांती मोर्चा आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com