Raju Shetty News : बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध Barsu Refinery Protest असेल तर आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. कोणाची तरी सुपारी घेऊन जमिनी हाडपण्याचा प्रयत्न झाला तर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना CM Eknath Shinde महागात पडेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetty यांनी राज्य सरकारला दिला.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणाला विराेध करणा-यांवर आज आंदोलनाचा दुस-या दिवशी पाेलिसांच्या बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे पाेलिस आणि आंदाेलकांमध्ये हमरीतुमरी झाली. खून झाला तरी चालेल, मेलाे तरी चालेल आम्ही लढणार मागे हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर पाेलिसांनी सुमारे 25 महिलांना ताब्यात घेतले.
या घटनेचा राजकीय नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी बारसूबाबतची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाची भूमिका दुटप्पी असल्याचे नमूद केले. त्यामुळे बारसूच्या वादात आणखी एक राजकीय ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी बारसूच्या विराेधात एकवटलेल्या महिला, पुरूषांवर दडपशाहीचा वरंवटा फिरवून माती परिक्षण करण्याचा घाट पोलिसांनी का घातला आहे, पोलिसांना यामध्ये इतका रस का आहे असा सवाल शेट्टींनी केला. रिफायनरी प्रकल्प कुणाच्या सांगण्यावरून रेटला जातोय ?
कोकणातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून नाणार हद्दपार केला. बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. कोणाची तरी सुपारी घेऊन जमिनी हाडपण्याचा प्रयत्न झाला तर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना महागात पडेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला. कोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी धावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.