Satara Politic's : मलकापूरमध्ये अतुल भोसले, मनोहर शिंदेची कमाल; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे सहा नगरसेवक बिनविरोध

Malkapur Nagar Parishad Election 2025 : मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले असून डॉ. अतुल भोसले यांनी मनोहर शिंदे यांना भाजपमध्ये आणल्याने सहा जागा बिनविरोध झाल्या आणि भाजपची बाजू भक्कम झाली.
Atul Bhosale-Manohar Shinde
Atul Bhosale-Manohar ShindeSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मलकापूरमध्ये भाजपने पहिल्यांदाच दमदार प्रवेश करत 22 पैकी 6 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.
डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांना भाजपमध्ये आणून रणनीतीत मोठी कमाल केली आहे.
उर्वरीत जागांसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) समविचारी पक्ष अशी रंगतदार लढत होणार आहे.

Karad, 22 November : भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सर्व शक्ती पणाला लावून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना पक्षात आणले आणि त्यांची कमाल माघारीच्या अन्‌ छाननीच्या दिवशी दिसून आली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मलकापूरमध्ये भाजपने निवडणुकीआधीच नगरसेवकांच्या २२ जागांपैकी सहा जागा बिनविरोध केल्या आहेत, त्यामुळे मलकापूरमध्ये प्रथमच भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मलकापूर नगरपालिकेच्या उर्वरीत सोळा जागांसाठी निवडणूक होत असून त्या जागांसाठीही भाजपने (BJP) फिल्डींग लावली आहे. दरम्यान भाजपच्या विरोधात तेथे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने समविचारींना बरोबर घेऊन शड्ड ठोकला आहे. त्यामुळे मलकापूरमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे (Manohar Shinde) यांनी शहराची घडी बसवली आहे. मलकापूरमध्ये राबवण्यात आलेली २४ बाय ७ पाणी योजना देशात आदर्शवत ठरली आहे. त्या शहराची ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका अशा प्रवासात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या माध्यमातूनच माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांनी शहरात विविध योजना राबवल्या.

मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले हे विजयी झाले. त्यानंतर आमदार डॉ. भोसले यांनी मलकापूरमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यास प्रारंभ केला होता. त्यासाठी त्यांनी पहिल्याच टप्यात माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांचे कट्टर असलेले माजी नगरसेवक राजेंद्र यादव यांना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये घेतले.

Atul Bhosale-Manohar Shinde
Solapur NCP : राष्ट्रवादीच्या घड्याळाची चावी धवलसिंह मोहिते पाटील अन्‌ संजयमामा शिंदेंच्या हाती; अजितदादांसाठी अस्तित्वाची लढाई

राजेंद्र यादव यांच्यानंतर आमदार भोसले यांनी टप्याटप्याने मलकापूरमधील अनेकांना पक्षात घेत थेट माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांनाच त्यांनी गळाला लावले. त्यांच्या माध्यमातून सध्या मलकापुर नगरपालिकेची निवडणूक लढवली जात आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी समविचारींना बरोबर घेऊन तेथे उमेदवार उभे केले आहेत.

मलकापुर पालिकेची सत्ता भाजपच्या हाती घेण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तगडी फिल्डींग लावली आहे. त्याअंतर्गत त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनाच भाजप पक्षात घेतले. त्यांनी भाजपचे हणमंत जाधव, सुनिता पोळ, ज्योत्स्ना शिंदे, दिपाली पवार, सुनील खैरे हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Atul Bhosale-Manohar Shinde
Mohite Patil : मोहिते पाटलांना बालेकिल्ल्यातच झुंजवणार; भाजपनं लावलं डबल इंजिन, राम सातपुतेंना जयकुमार गोरेंची रसद

त्याचबरोबर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग तीन मधील राष्ट्रवादीच्या सुवर्णा श्रीकृष्ण शिंदे यांनी अर्ज माघारी घेतल्याने तेथील भाजपच्या उमेदवार रंजना अशोक पाचुंदकर यांची बिनविरोध झाली आहे. भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले आणि मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या करिष्म्याने निवडणुकीपूर्वीच भाजपने मलकापूर नगरपालिका निवडणुकीत खाते उघडले असून उर्वरीत जागांसाठी आता भाजपने फिल्डींग लावली आहे.

Q1. मलकापूरमधील काँग्रेसची स्थिती का कमकुवत झाली?
A. भाजपने काँग्रेसच्या कट्टर समर्थकांना पक्षात घेतल्यामुळे.

Q2. भाजपने किती जागा बिनविरोध जिंकल्या?
A. सहा जागा.

Q3. राष्ट्रवादीच्या विरोधात कोण लढत उभी करीत आहे?
A. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारींसोबत.

Q4. भाजपचे नेतृत्व या निवडणुकीत कोणाकडे आहे?
A. आमदार डॉ. अतुल भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com