Mohite Patil : मोहिते पाटलांना बालेकिल्ल्यातच झुंजवणार; भाजपनं लावलं डबल इंजिन, राम सातपुतेंना जयकुमार गोरेंची रसद

Akluj Nagar Parishad Election 2025 : अकलूज ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील घराण्याचे दीर्घकाळाचे वर्चस्व असून नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत अकलूजमध्ये राजकीय स्पर्धा पाहायला मिळत आहे.
Ram Satpute-Jaykumar Gore-Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil
Ram Satpute-Jaykumar Gore-Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

97 वर्षांचा इतिहास असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पक्षीय व बहुरंगी लढत होत आहे.
मोहिते पाटील घराण्याचे दशके वर्चस्व असलेल्या अकलूजात आता भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), वंचित व इतर पक्ष मैदानात उतरले आहेत.
13 प्रभागातील 26 नगरसेवक व थेट निवडणूक असलेल्या नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा रंगणार असून ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.

Solapur, 21 November : सुमारे 97 वर्षांचा इतिहास असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील घराण्याचे निर्विवाद वर्चस्व होते. एक दोन अपवाद सोडल्यास अनेकदा बिनविरोध निवडणूक होत होत्या. निवडणूक झालीच तर ती मोहिते पाटील समर्थक आणि विरोधकांमध्ये होत होती. आता त्याच ग्रामपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर झाले असून नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे.

अकलूजकरांच्या इतिहासातील ही पहिलीच पक्षीय आणि बहुरंगी लढत होणार आहे. अकलूज (Akluj) ग्रामपंचायतीची स्थापना ब्रिटिश कालखंडात १९२२ मध्ये झाली असून रामचंद्र व्होरा या ग्रामपंचायतीचे सरपंच होते. सन १९४० ते ४५ या कालावधीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील तर १९६९ ते ७२ या कालावधीत विजयसिंह मोहिते पाटील यांनीही सरपंच म्हणून या ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला आहे.

मोहिते पाटील (Mohite Patil) घराण्यातील अनेकांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अकलूज ग्रामपंचायतपासून केली आहे. अकलूज ग्रामपंचायतीच्या २०१० च्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख (स्व.) दत्ता वाघमारे यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पॅनेल उभा केल्याने ती एकमेव निवडणूक गाजली होती. हा अपवाद वगळता या ग्रामपंचायतीत अटीतटीची अशी कधी ही निवडणूक झाली नाही.

बहुतेकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोधच झाल्या. मात्र, शेवटच्या दोन निवडणुकात डॉ धवलसिंह मोहिते पाटील आणि फत्तेसिंह माने पाटील यांनी संयुक्तिक पॅनल करून निवडणूक लावली होती, त्यामध्ये त्यांना एक वेळ दोन तर एक वेळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र, मोहिते पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.

Ram Satpute-Jaykumar Gore-Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचा नवा बॉम्ब; आमदार अभिजीत पाटलांच्या पराभवासाठीच रणजित शिंदेंना भाजप प्रवेश दिलाय

अकलूज ग्रामस्थांनी तब्बल ४३ दिवसांचे साखळी उपोषण करून नगर परिषदेची मागणी लावून धरली होती. त्यामुळे ३ ऑगस्ट २०२१ रोजी अकलूज नगर परिषद घोषित करण्यात आली. मात्र, तेव्हापासून नगर परिषदांच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय कारभार होता. आताची निवडणूक ही १३ प्रभागातून २६ नगरसेवक तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी होणार आहे

भाजपने लावली ताकद

नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातले. भाजप पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करीत नगराध्यक्षपदासह पूर्ण पॅनेल उभा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पद्मजादेवी मोहिते पाटील यांना निवडणुकीचे सर्व अधिकार दिल्याने धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी नगराध्यक्षपदासह संपूर्ण पॅनेल उभा केले आहे.

वंचितचेही उमेदवार रिंगणात

वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र विकास सेना या पक्षांनी नगराध्यक्षपदासह काही उमेदवार उभा केले आहेत. याबरोबरच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या मित्र पक्षांना काही जागा दिल्या आहेत. त्यांचेही उमेदवार रिंगणात असल्याने ही बहुपक्षीय बहुरंगी निवडणूक रंगणार आहे.

Ram Satpute-Jaykumar Gore-Ranjitsinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil
Ajit Pawar NCP : बारामतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने गुलाल उधळला; आठ जागांवर बिनविरोध बाजी!

Q1. अकलूजमध्ये नगर परिषदेची पहिली निवडणूक कधी होत आहे?
A. 3 ऑगस्ट 2021 ला घोषणा झाल्यानंतर आता पहिलीच निवडणूक होत आहे.

Q2. अकलूज ग्रामपंचायतीचा इतिहास किती वर्षांचा आहे?
A. सुमारे 97 वर्षांचा.

Q3. कोणत्या घराण्याचे येथे दीर्घकाळ वर्चस्व होते?
A. मोहिते पाटील घराण्याचे.

Q4. कोणते प्रमुख राजकीय पक्ष मैदानात आहेत?
A. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्ष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com