Solapur Politics : बबनदादांनी टायमिंग साधलं; फडणवीस माढ्यात असतानाच पवारांच्या भेटीसाठी पुणे गाठले!

Babandada Shinde Meet Sharad Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आज माढा तालुक्यात श्री क्षेत्र अरण येथे भक्त निवासाच्या भूमिपूजनासाठी आले होते. माढ्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने बबनदादा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच बबनदादांनी थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बाग गाठली.
Devendra Fadnavis-Sharad Pawar-Babanrao Shinde
Devendra Fadnavis-Sharad Pawar-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आज (ता. 04 ऑगस्ट) आपले चिरंजीव आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात जाऊन भेट घेतली.

या भेटीच्या टायमिंगची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण, महायुतीचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे माढ्यात असताना बबनदादांनी थेट पवारांच्या दरबारात हजेरी लावले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आज माढा तालुक्यात श्री क्षेत्र अरण येथे भक्त निवासाच्या भूमिपूजनासाठी आले होते. माढ्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने बबनदादा शिंदे (Babandada Shinde) या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच बबनदादांनी थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बाग गाठली.

पवार यांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत रणजितसिंह शिंदे, बबनदादा आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात कुठल्या विषयावर चर्चा झाली याबाबतची माहिती मिळू शकली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या घडामोडी घडत असल्याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Devendra Fadnavis-Sharad Pawar-Babanrao Shinde
Babandada Shinde : अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंनी मुलासह घेतली शरद पवारांची भेट; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

माढ्यातून विधानसभेची निवडणूक आमदार बबनदादा शिंदे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे लढवणार असल्याची चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, शरद पवार यांच्या तुतारीचे मोठे आव्हान असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे, त्यामुळे मुलाची राजकीय इनिंग विना अडथळा सुरू व्हावी, यासाठी बबनदादांनी पवारांना साकडे तर घातले नाही ना, असा सवाल विचारला जात आहे.

दुसरीकडे बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी दिली येथे जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे माढ्याच्या शिंदे बंधूमधील भाऊबंदकी उफाळल्याची चर्चा आहे. दोन बंधूंमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, असे बोललं जाऊ लागले होते. तेवढ्यात खुद्द बबनदादांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Devendra Fadnavis-Sharad Pawar-Babanrao Shinde
Angar Upper Tehsil Office : अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या वादात प्रणिती शिंदेंची उडी; थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणीस आणि छगन भुजबळ हे माढ्यात आलेले असतानाही नेमके त्याच वेळी बबनदादा शिंदे यांनी मुलासह शरद पवार यांची भेट घेतली, त्यामुळे बबनदादांनी पवारांच्या भेटीसाठी साधलेल्या टायमिंगची एकच चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीला आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय गाठीभेटीमुळे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com