Bacchu Kadu : बच्चू कडू संतापले; ‘मुख्यमंत्री फडणवीसांना आता हिसका दाखवावाच लागेल’

Farmer Loan Waiver issue : माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकरी कर्जमुक्तीचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप केला आहे.
Devendra Fadnavis-Bacchu Kadu
Devendra Fadnavis-Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on
  1. कर्जमाफीचा मुद्दा – माजी मंत्री बच्चू कडू यांनी आरोप केला की निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन देऊनही सरकारने वर्षभरात काहीच कृती केली नाही.

  2. साखर कारखान्यांवरील कारवाईची मागणी – सोलापूरातील 33 पैकी फक्त 9 कारखान्यांनी FRP दिली असून 93 कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याने कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी दिली.

  3. सरकारवर थेट हल्ला – मुख्यमंत्री प्रत्यक्ष पाहणी न करता फक्त अहवाल मागवत आहेत, तसेच मोठ्या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपये माफ करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

Solapur, 16 September : विधानसभा निवडणुकीच्या आधी हेच देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. पण वर्ष झालं तरी त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचे रक्त सांडल्याशिवाय काही करणार नसाल तर मुख्यमंत्र्यांना आता हिसका दाखवला पाहिजे, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, सोलापुरातील विडी कामगार आणि मील कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. येत्या 19 तारखेपर्यंत तुम्हीच आयुक्ताना वेळ द्या, त्यानंतर 20 तारीख आमची असेल. माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे, आमचे आंदोलन फार वाईट असतात.

पालकमंत्री येतात आणि रस्त्यावरून अतिवृष्टची पाहणी करतात, त्यापेक्षा तुम्हीच हेलिकॉप्टरमधून पाहणी करतात. आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः ग्राउंडवर जाऊन पाहणी करत होते. मात्र, आमचे देवाभाऊ टीव्हीवरूनच अहवाल मागवतात. उद्धव ठाकरे यांना हे ऑनलाईन मुख्यमंत्री म्हणत होते, तेच स्वतः आता ऑनलाईन झाले आहेत, असेही कडू यांनी सांगितले.

ते म्हणाले, सोलापूर उसाचा पट्टा म्हणून आम्ही पाहतो, सोलापूर जिल्ह्यात 33 साखर कारखाने आहेत, पण फक्त 9 कारखान्यांनी एफआरपी दिली. कायदा सांगतो जर FRP दिली नाही, तर जप्ती केली पाहिजे. पण, वर्ष झालं तरी शेतकऱ्यांचे 93 कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. जर पैसे देणार नसतील, तर गुन्हे दखल करा. जर तेही होणार नसेल तर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करा.

Devendra Fadnavis-Bacchu Kadu
Nirmalatai Thokal : काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

शेतकरी लुटला जात असेल तर मग आपल्या संघटनेला अर्थ उरणार नाही. काही ठिकाणी काट्याच्या, तर काही ठिकाणी रिकव्हरीच्या माध्यमातून लुटलं जातं. आमची संघटना ही शेतकरी आणि शेतमजुरांसाठी आहे. बाकीचे भांडू द्या जातीसाठी; पण आम्ही शेतकरी शेतमजूरसाठी भांडू. या सरकारने अदानी आणि अंबानींचे कोट्यवधी रुपये माफ केले आहेत. मात्र शेतकरी कर्जमाफीवर कोणी बोलायला तयार नाहीत, असेही कडू यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार कडू म्हणाले, शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव काय आहेत, पाहा. कष्ट करून मालाला भाव मिळत नसेल तर काय फायदा? मला प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही कोणत्या जातीच्या व्यासपीठावर दिसणार का? पण, मी ठणकाहून सांगितलं की, शेतकरी, दीन दलितांच्या भल्यासाठी मी असेल. सगळे जातीसाठी लढत असले तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू.

Devendra Fadnavis-Bacchu Kadu
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, आता महायुती सरकारचा बदला घ्या; वडेट्टीवारांचे वादग्रस्त आवाहन...

बच्चू कडू यांनी सरकारला कोणता इशारा दिला?
उ. – शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविल्यास आणि कर्जमाफी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणता आरोप केला?
उ. – ते स्वतः मैदानावर न जाता फक्त ऑनलाईन अहवाल मागवतात, असा आरोप केला.

: उद्योगपतींबाबत कडू यांचा काय आरोप आहे?
उ. – अदानी आणि अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपये माफ करून शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com