Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, आता महायुती सरकारचा बदला घ्या; वडेट्टीवारांचे वादग्रस्त आवाहन...

Vijay Wadettiwar Statement : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर लाडकी बहिणींना फसवल्याचा आरोप केला. लाडक्या बहिणींना आगामी निवडणुकीत बदला घेण्याचे आवाहन केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on
  1. लाडकी बहीण योजना वाद – विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केला की निवडणुकीआधी योजना गेमचेंजर ठरली, पण नंतर लाभार्थ्यांना अपात्र ठरवून हप्ते थांबवले.

  2. निवडणूकपूर्व इशारा – स्थानिक स्वराज्य निवडणुकीनंतर उरलेल्या लाभार्थींनाही वगळले जाईल, म्हणून बदला घ्यावा असे वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणींना आवाहन केले.

  3. आर्थिक गैरव्यवस्था आरोप – राज्याचे कर्ज नऊ ते दहा लाख कोटींवर पोहोचल्याचा दावा करत, भाजपवर प्रकल्पांचे अंदाज फुगवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

Nagpur, 16 September : तुमच्या जोरावर महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर तुमचा विसर पडला, हप्ते देणे बंद केले. अनेकांना योजनेतून बाद केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होऊ घातल्याने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी हप्त्याची जुळवाजुळव केली जात आहे. पण, तुम्ही सावध राहा. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांना लाभ दिला, त्यानंतर त्यांना अपात्र ठरवले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर उरल्या सुरल्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोजून बदला घ्या, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणींना केले. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरली. महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले, त्यानंतर मात्र लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूद करताना सरकारला तारेवरील कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते. सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याने मोठा वादही निर्माण झाला होता. त्यानंतर लाडक्या बहिणींची संख्येत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पडताळणी करताना काही सरकारी कर्मचारी असलेल्या बहिणींनीसुद्धा याचा लाभ घेतल्याचे आढळून आले. सुरुवातीला सरकारी बहिणींना स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानंतर केंद्र व राज्य यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल, असे फर्मान काढण्यात आले.

दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणींना आता लाडक्या बहिणीतून वगळले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आता हा मुद्दा काँग्रेसकडून तापवला जाणार असल्याचे दिसून येत आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या आवाहनावरून सरकारवर नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना कॅश केले जात असल्याचे दिसून येते.

Vijay Wadettiwar
Nirmalatai Thokal : काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

निम्म्या बहिणींना योजनेतून वगळले आहे. महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक आटोपल्यानंतर उरल्या सुरल्या बहिणींनाही वगळण्याचे काम सुरू होईल, असे सांगून वडेट्टीवारांनी बदला घेतल्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपच सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते. सत्तेसाठी लोकप्रिय घोषणा केल्या आणि राज्याला कर्जबाजारी केले. उद्या ते महाराष्ट्रालाही विकतील. आज जे कर्ज दिसत आहे, ते नऊ लाख कोटींच्या घरात आहे आहे, लोकांची देणे आहेत, ते पाहिलं तर दहा लाख कोटींचं कर्ज आहे. पुढील दोन, तीन वर्षे महाराष्ट्राला कर्जातून बाहेर काढणे कठीण आहे. अशाप्रकारे राज्याला बरबाद करण्याचे काम सुरू आहे.

Vijay Wadettiwar
Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील सव्वा लाख 'लाडक्या बहिणीं'चे अर्ज बाद! 'या' दोन नियमांचा केला भंग

इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर एखाद्या कामाचे एस्टिमेट वाढवून ४०० कोटी केले जाते. त्यातील २०० कोटी आपल्या घशात घातले जात आहे. आम्ही चौकशीची मागणी केली आहे. दरवेळी करतो आहे. सरकार बेशरमाचे झाड लावून बसले असेल तर त्याला काही इलाज नाही, असा हल्लाबोलही वडेट्टीवार यांनी केला.

प्र.1: लाडकी बहीण योजनेबाबत वडेट्टीवार यांनी काय आरोप केला?
उ. – सरकारने निवडणुकीनंतर अनेक लाभार्थींना अपात्र ठरवून हप्ते बंद केले, असा आरोप त्यांनी केला.

प्र.2: स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी त्यांनी कोणता संदेश दिला?
उ. – लाडक्या बहिणींनी मतांच्या माध्यमातून सरकारला बदला घ्यावा, असे आवाहन केले.

प्र.3: राज्याच्या कर्जाबाबत त्यांचा दावा काय आहे?
उ. – महाराष्ट्राचे एकूण कर्ज सुमारे दहा लाख कोटींवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

प्र.4: भाजपवर त्यांनी कोणता भ्रष्टाचाराचा आरोप केला?
उ. – इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचे अंदाज वाढवून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com