Nirmalatai Thokal : काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Solapur Congress News : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ यांचे वयाच्या 85 व्या वर्षी सोलापूरमध्ये निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Nirmalatai Thokal
Nirmalatai Thokal Sarkarnama
Published on
Updated on
  1. निर्मलाताई ठोकळ यांचे निधन – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ (वय 85) यांचे सोलापूरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

  2. दीर्घ राजकीय कारकीर्द – 1962 ते 1974 या काळात दोनदा नगरसेवक, 1972 मध्ये विधानसभा सदस्य आणि 1982 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.

  3. सामाजिक-सहकारी योगदान – सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संस्थापक संचालक आणि मराठी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Solapur, 16 September : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ यांचे आज (ता. 16 सप्टेंबर) सकाळी नऊच्या सुमारास सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत.

माजी आमदार ठोकळ ह्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर सोलापूर (Solapur) शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

निर्मलाताई ठोकळ (Nirmalatai Thokal) या स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे (Congress) माजी खासदार (स्व) तुळशीसदादा जाधव यांच्या होत. राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला. सोलापूर महानपालिकेवर १९६२ ते १९६७ आणि १९६९ ते १९७४ अशा दोन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. सोलापूर महापालिकेसोबतच त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत काम केले आहे.

विधानसभेच्या १९७२ च्या निवडणुकीत निर्मलताई ठोकळ ह्या सोलापूर शहर दक्षिण मतदार संघामधून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांनी त्या निवडणुकीत हिंदू महासभेचे मातब्बर नेते वि. रा. पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९८२ मध्ये निर्मलाताई यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर निवड करण्यात आली होती.

Nirmalatai Thokal
Ram Satpute : राम सातपुतेंना माळशिरसमध्ये उमेदवार म्हणून आणणे, ही माझी चूक ठरली : ज्येष्ठ भाजप नेत्याची कबुली

निर्मलाताई ठोकळ यांनी विधान परिषदेच्या आश्वासन समितीचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. तसेच, पंचायत राज व अन्य समित्यांवरही त्यांची निवड झाली होती. सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संस्थापक संचालक म्हणून त्यांनी १९७५ ते १९८४ या कालावधीत काम पाहिले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी १९९२ ते १९९८ या कालावधीत काम पाहिले आहे. सोलापूर येथील २००६ मध्ये झालेल्या ७९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या कार्याध्यक्ष होत्या. तसेच, २००४ ते २००६ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

Nirmalatai Thokal
Pandharpur Corridor : ‘डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी कोणालाही घाबरत नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘हा’ सल्ला देऊ शकतात’

प्र.1: निर्मलाताई ठोकळ यांचे निधन कधी झाले?
उ. – 16 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास सोलापूरमध्ये त्यांचे निधन झाले.

प्र.2: त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिली निवडणूक कोणती होती?
उ. – 1962 मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकपदाची.

प्र.3: विधानसभेत त्या कधी निवडून आल्या?
उ. – 1972 मध्ये सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर.

प्र.4: सहकारी क्षेत्रातील त्यांचे महत्त्वाचे योगदान कोणते?
उ. – सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी महिला आर्थिक स्वावलंबनाला चालना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com