Sangamner Politics : तिकडे दडपशाही अन् दहशतवाद; थोरातांनी भाजपला कठोर शब्दांत सुनावलं !

Balasaheb Thorath News : "थोरातांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश..."
Sangamner Politics
Sangamner Politics Sarkarnama
Published on
Updated on

Sangamner News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाव न घेताच चांगलेच डिवचले आहे. आगामी काळात काँग्रेसची सत्ता येणार आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेले पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची धडपड करतील, असे आमदार थोरात यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

Sangamner Politics
Hingoli NCP News : बंडात साथ नाही, तरी अजितदादांचा दिलदारपणा; आमदार नवघरेंना कोट्यवधींचा निधी...

राहाता तालुक्यातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी आमदार थोरात यांनी काँग्रेसचे विचार सर्व जातीधर्मासह सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारे आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विचार कोणीही मिटवू शकत नाही. काँग्रेसचे विचार जेवढे मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल, तेवढे ते अधिक रुजतील, असा दावा केला.

Sangamner Politics
Aam Aadmi Party : ''केंद्राला लोकशाही मान्य नाही, त्यामुळे...'' ; 'आप'चे नगर जिल्हाध्यक्ष आघावांचं विधान!

आमदार थोरात यांनी भाजपचे नाव न घेता तेथील त्यांची दडपशाही आणि दहशत सुरू आहे, असा आरोप केला. सत्ताधारी पक्ष हा जाती धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. याचे परिणाम आपण सर्व जण पाहत आहोत. समाजात या पक्षामुळे अस्थिरता आली आहे. या दहशतीविरुद्ध जनतेनेच आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेस सोडून तिकडे गेलेल्यांच्या हे लक्षात आले आहे. तेच आता इकडे घेण्यासाठी आगामी काळात धडपड करताना दिसतील, असेही आमदार थोरात म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. राज्यघटना आणि लोकशाही मानणारा काँग्रेस असून, काँग्रेसला बलिदानाची परंपरा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सर्वसामान्य, गोरगरीब आणि सर्वांना व्यापून घेणारा पक्ष आहे, असे आमदार थोरात यांनी सांगितले. राहाता तालुक्यातील आरपीआयचे अमोल कोळगेंसह अनेकांनी या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सचिन चौगुले यांनी आभार मानले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com