Ahmednagar News : आम आदमी पक्षाने वर्धापनदिन आणि संविधान दिनानिमित्ताने नगर जिल्ह्यात संविधान दिंडी काढली आहे. प्रजासत्ताक दिनापर्यंत ही दिंडी नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये फिरणार आहे. या संविधान दिंडीला आज पाथर्डीतून सुरूवात झाली. आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव यांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
"केंद्राला लोकशाही मान्य नाही. त्यामुळे आपचे नेते मनीष सिसोदीया, खासदार संजय सिंग यांना जेलमध्ये ठेवले. आता अरविंद केजरीवालांना देखील अटक करण्याच्या हालचाली सुरू आहेत", असे राजेंद्र आघाव यांनी म्हटले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम आदमी पक्षाच्या जिल्हा संघटनेकडून तालुक्यातील अकोले येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनापासून सुरु झालेली संविधान दिंडी प्रजासत्ताक दिनापर्यंत संपूर्ण नगर जिल्हयातील विविध तालुक्यात जावून तेथे जनेतेशी संविधान संवाद साधणार असल्याची माहिती आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव व संवाद दिंडीचे समन्वयक सुभाष केकाण यांनी दिली.
आम आदमी पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आज राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटन सचिव अजित फाटके यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
नगर जिल्ह्यात पाथर्डीतून सुरू झालेल्या दिंडीत प्रकाश फराटे, प्रा. अशोक डोंगरे, अॅड. विद्या शिंदे, विजय शिंदे, श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे, नेवाशाचे संदीप आलवणे, संविधानाचे अभ्यासक देवराम सरोदे, राम लाड, अकोलेचे युवा नेते जयदत्त गर्जे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर यावेळी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "केंद्र सरकारच्या विरोधात आपचे नेते खरं बोलतात. त्यांच्या धोरणावर टीका करतात. केंद्रातील सरकारला टीका मान्य नाही. लोकशाही मान्य नाही. त्यामुळे आपचे नेते मनीष सिसोदीया, खासदार संजय सिंग यांना जेलमध्ये ठेवले आहे. अरविंद केजरीवालांना देखील अटक करण्याच्या तयारी आहेत.
भ्रष्टाचारी नेत्यांना अभय व प्रामाणिक असलेल्यांना हे केंद्र सरकार तुरुंगात डांबत आहे. केंद्राची ही नीती जास्त दिवस चालणार नाही. आप याला भीक घालत नाही. देशातील सामान्य नागरिक आपच्या मागे खंबीरपणे उभा आहे.'', असेही राजेंद्र आघाव म्हणाले.
तसेच संविधान संवाद दिंडीचे समन्वयक सुभाष केकाण यांनी संविधान शिकणे, समजणे, उमजणे म्हत्वाचे आहे. संविधान समजले तरच सामान्य माणूस प्रस्थापित व्यवस्थेला उलथवू शकतो, असे सांगितले.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.