Karad NCP News : बाळासाहेब पाटलांचे कराड उत्तरच्या जनतेला आवाहन; फुकटचे श्रेय घेणाऱ्यांपासून सावध रहा

Balasaheb Patil कण्हेरखेड येथे त्यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी बाळासाहेब पाटील बोलत होते.
Balasaheb Patil, Manoj Ghorpade
Balasaheb Patil, Manoj Ghorpadesarkarnama
Published on
Updated on

Karad NCP News : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व गावे, वाड्यावस्त्यांना समान न्यायाने निधीचे वाटप केले. त्यातून विकासाचा झंझावात सुरू आहे. मात्र, निवडणुका जवळ आल्या, की काही मंडळी झालेली विकासकामे आम्हीच केली, या अविर्भावात भाषणबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध रहा, असे आवाहन राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

कण्हेरखेड येथे त्यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‌घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे NCP आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil बोलत होते. सह्याद्री कारखान्याचे संचालक अविनाश माने, काकासाहेब गायकवाड, भरत कदम, अमोल कदम, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘‘मतदारसंघात विविध विकासकामे सुचविण्याचा, त्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचा, निधी उपलब्ध करून घेण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांच्या सहकार्याने मला मिळाला आहे. त्याद्वारे मी कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व गावे, वाड्यावस्त्यांना समान न्यायाने निधीचे वाटप केले.

त्यातून विकासाचा झंझावात सुरू आहे. मात्र, निवडणुका जवळ आल्या, की काही मंडळी झालेली विकासकामे आम्हीच केली. या अविर्भावामध्ये भाषणबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून सावध रहा.’’

Balasaheb Patil, Manoj Ghorpade
Ajit Pawar Vs Fadnavis: अजितदादांच्या नव्या अटीला फडणवीसांनी दाखवली केराची टोपली; BJP नेत्यांच्या कारखान्यांवरील बंधने हटविली

यावेळी शंकर शिंदे, प्रशांत संकपाळ, विजय कदम, समाधान कदम, प्रशांत कदम, अलम डफेदार, समाधान गायकवाड, शेखर पाटणे, विठ्ठल काकडे, शिवाजी महागडे, एकनाथ जेधे, शंकर सणस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश धुमाळ, साखरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चव्हाण, सरपंच संजय शिंदे, ॲड. दीपक शिंदे, अध्यक्ष संभाजी शिंदे, उपाध्यक्ष वाघमारे, अर्चना शिंदे, नलिनी पवार, रूपाली साळुंखे, वर्षा शिंदे, कांचन शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com