Balasaheb Thorat : मुंडे अन् कोकाटेंच्या राजीनाम्याचा विषय निघताच बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस अन् महायुतीतला फरक दाखवला

Congress Leader Balasaheb Thorat On Mahayuti : मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या बोलताना काँग्रेस आणि महायुती सरकारमधला फरकच दाखवला. ते म्हणाले, या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे...
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : धर्माचं राजकारण करायचं आहे, लोकांची मतं मिळवायची आहेत. महायुतीला कशी मते मिळाली हे सर्वांना माहिती आहे. हे सगळं झाकण्यासाठी सूरु आहे. असा शब्दात काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापुरात ते बोलत होते. वाल्मिक कराड असु दे किंवा इतर कोण? यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी. गुन्हेगारांवर दहशत असली पाहिजे अशी कडक शिक्षा असावी, अशा शब्दांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांची रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या बोलताना काँग्रेस आणि महायुती सरकारमधला फरकच दाखवला. ते म्हणाले या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. काँग्रेसचा एक पूर्वीचा काळ असा होता की, मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. लाल बहादूर शास्त्रींनी देखील एका रेल्वे अपघातानंतर राजीनाम्याबाबत विचार झालेला. हा एक नीतिमत्तेचा विषय आहे. तो पाळला पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

राज्यातील महायुती सरकारमध्ये आलबेल नाही , दोन वर्षांत प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. पैसा उभा करण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत हे समोर येत आहे. पालकमंत्री सुद्धा निघू शकत नाहीत, ही अवस्था असल्याची टीका थोरात यांनी करत तीन महिने होऊनही मंत्र्यांना स्टाफ नाही. मंत्र्यांना स्वतःचे अधिकार नाहीत ही परिस्थिती आहे. राज्य सरकार मध्ये असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

Balasaheb Thorat
Anil Deshmukh News : वयाची सत्तरी पार केलेल्या अनिल देशमुखांवर विदर्भात 'तुतारी' फुंकण्याची जबाबदारी!

शेतकऱ्यांशी चर्चा करूनच महामार्गबाबत निर्णय व्हायला हवा. जबरदस्तीने महामार्ग होणार असेल तर योग्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना चर्चेला बोलावलं पाहिजे, त्यानंतर निर्णय व्हायला पाहिजे. अशा शब्दात शक्तिपीठ महामार्गाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com