Satara ZP Election : रामराजे, संजीवराजे नाईक निंबाळकरांची बालेकिल्ल्यातच दमछाक; विधानसभेनंतर बदलली गणित

Ramraje and Sanjivraje Naik-Nimbalkar : बरड जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित; राजे गटाविरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत होणार, गड राखण्यासाठी दोन्ही गट अलर्ट मोडवर
Ramraje and Sanjivraje Naik-Nimbalkar face a tough challenge in the Barad ZP group as Mahayuti enters their stronghold after SC reservation reshapes local equations.
Ramraje and Sanjivraje Naik-Nimbalkar face a tough challenge in the Barad ZP group as Mahayuti enters their stronghold after SC reservation reshapes local equations.Sarkarnama
Published on
Updated on

- मनोज पवार

Satara ZP Election : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, नव्याने निर्माण झालेल्या बरड गट व बरड आणि दुधेबावी गणावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकद लावण्याच्या तयारीत आहेत. बरड गटात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर गटाविरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत होणार असली, तरी गटाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी असल्‍याने आणि दोन्ही गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असल्‍याने येथील चुरशीच्‍या लढतीत निडर भूमिका घेणारा लढवय्‍या उमेदवारच निर्णायक ठरेल, असे संकेत आहेत.

बरड जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने तालुक्यात हा गट सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा बनला आहे. दोन्ही गणात सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने याठिकाणी तुल्यबळ लढती होतील, असे चित्र आहे. गट कोणत्याही परिस्थितीत राजे गटाच्या ताब्यातून सुटू नये, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत, तर अन्‍य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुपचूपपणे चाचपणी सुरू केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बरड जिल्हा परिषद गटावर विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे प्राबल्‍य राहिले आहे; परंतु नुकत्‍याच झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर या गटात अनेक उलथापालथ झाल्याने राजे गट व त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आपला गड राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

Ramraje and Sanjivraje Naik-Nimbalkar face a tough challenge in the Barad ZP group as Mahayuti enters their stronghold after SC reservation reshapes local equations.
Phaltan Doctor Case: निंबाळकरांची वादळी पत्रकार परिषद; स्क्रिन लावत विरोधकांना ओपन चॅलेंज; अंधारेंचा 'मास्टरमाईंड'ही काढला...

दुसरीकडे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी गटात विविध विकासकामे करून गटावर प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न केला. या गटातील स्थानिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा गट आपल्या ताब्यात कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहेत.

कदमांचाही वट

पूर्वी या गटावर चिमणराव कदम यांचे वर्चस्व होते. त्यामुळे या ठिकाणी सह्याद्री कदम यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष कोणती भूमिका घेणार, की स्वबळावर लढणार? हे अद्याप निश्चित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये सध्या तरी शांतता दिसून येत आहे. असे असले तरी आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते हे या गटामध्ये काय भूमिका काय घेणार? यावरही अनेक समीकरणे उदयास येऊ शकतात.

राष्‍ट्रवादीकडे ओघ

राज्यात सध्या महायुतीचे सरकार असले, तरी स्थानिक पातळीवर काय होणार? हे अद्याप गुलदस्‍त्‍यात आहे. अशा स्‍थितीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांकडून दबक्या आवाजात वरिष्ठांच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. याउलट राष्ट्रवादीकडे अनेक इच्छुकांची रांग लागली असून, हे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास तयार आहेत.

Ramraje and Sanjivraje Naik-Nimbalkar face a tough challenge in the Barad ZP group as Mahayuti enters their stronghold after SC reservation reshapes local equations.
Ramraje : मला तुरुंगात टाकच; मग बघतो फलटणमध्ये तू कसा राहतो ते?; तुरुंगातून तुला थर्ड लावेन : रामराजेंचा कडक इशारा

विकासाचा मुद्दा

गेल्या काही वर्षांत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून बरड जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण केली आहेत, तर दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी आजवर केलेली विकासकामे पुढे ठेवून येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर जावे लागणार आहे. येथील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होईल, असे संकेत मिळत आहेत. उमेदवार हा सुशिक्षित, निष्ठावान आणि आपल्या विचारांचा असावा, असा प्रत्येक पक्षाचा अजेंडा राहणार आहे. त्यामुळे गट व गणात सक्षम उमेदवार शोधण्यासाठी नेतेमंडळींची दमछाक होणार, हे निश्चित आहे.

पुनर्रचित गटात संधी कोणाला?

बरड जिल्हा परिषद गट पूर्वी कोळकी जिल्हा परिषद गटात होता. अनेक मातब्बर नेते मंडळींनी त्‍याचे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, रामचंद्र भोसले (झिरपवाडी) यांनी जिल्हा परिषदेसाठी प्रतिनिधित्व केले, तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर व त्यांच्या पत्नी भावना सोनवलकर यांनीही येथून प्रतिनिधित्व केले आहे. आता पुनर्रचित बरड गटाचे प्रतिनिधित्व कोण करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संधीसाठी उत्सुक :

अनुसूचित जातीसाठी राखीव बरड जिल्हा परिषद गटात राजे गटाकडून राजकुमार बाबर, संदीप कांबळे (निंबळक) आणि संदेश आढाव (आंदरुड) यांची नावे चर्चेत आहे. बाबर फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे संचालक आहेत. संदीप कांबळे यांच्या पत्नी निंबळक ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत तर संदेश आढाव (आंदरुड) यांच्‍या आई आंदरुड गावच्या सरपंच आहेत.

तर रणजितसिंह नाईक निंबाळकर गटातून शरद झेंडे (मुंजवडी), बरडचे सरपंच जनार्दन लोंढे, भाऊसाहेब मोरे (दुधेबावी) यांची नावेही पुढे येत आहेत. हे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून चर्चेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com