Phaltan Doctor Case: निंबाळकरांची वादळी पत्रकार परिषद; स्क्रिन लावत विरोधकांना ओपन चॅलेंज; अंधारेंचा 'मास्टरमाईंड'ही काढला...

Ranjitsinh Naik Nimbalkar Pree Conference: फलटण महिला डॉक्टर प्रकरणाचे तीव्र पडसाद हे राज्यभरात उमटत आहे. याचदरम्यान, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. पण आता या आरोपांना त्यांनी थेट स्क्रिन लावून जोरदार पलटवार केला.
Ranjitsinha Nimbalkar ramraje nimbalkar sushma Andhare mehboob shaikh .jpg
Ranjitsinha Nimbalkar ramraje nimbalkar sushma Andhare mehboob shaikh .jpgSarkarnama
Published on
Updated on

Satara News: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्यासह विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर धक्कादायक आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण या सर्व आरोपांनी एकीकडे उलटसुलट चर्चांना उधाण आलं असतानाच निंबाळकर यांनी वादळी पत्रकार परिषद घेत आपली रोखठोक भूमिका मांडतानाच विरोधकांना ओपन चॅलेंज दिले.

माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी (ता.3) जाहीर पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले. तसेच त्यांनी यावेळी फलटण डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी आपण नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं ठणकावलं. यावेळी त्यांनी आपल्या सोबत आरोप करणाऱ्या सर्वांची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी करत विरोधकांना एकप्रकारे जोरदार प्रत्युत्तर दिले.

निंबाळकर म्हणाले, मला सुषमाताई, मेहबूब शेख, विरोधी नेतेमंडळींना सांगायचं आहे की, मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण त्याचबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही नार्को टेस्ट करायला ते तयार असल्याचं आज सर्व सोशल मीडियावर जाहीर करावं", असं ओपन चॅलेंज निंबाळकर यांनी दिलं. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांच्या नार्को टेस्टचा खर्च करायला आपण तयार आहोत, असंही निंबाळकर यांनी सुनावलं.

फलटण महिला डॉक्टर प्रकरणाचे तीव्र पडसाद हे राज्यभरात उमटत आहे. याचदरम्यान, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. पण आता या आरोपांना त्यांनी थेट स्क्रिन लावून जोरदार पलटवार केला. ही पत्रकार परिषद संपताच रणजितसिंह निंबाळकर यांच्या समर्थकांनी त्यांचा दुग्धाभिषेक केला.पत्रकार परिषदेत आक्रमक झालेले माजी खासदार मात्र यावेळी अचानक भावनिक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले.

Ranjitsinha Nimbalkar ramraje nimbalkar sushma Andhare mehboob shaikh .jpg
Thackeray Brothers Unity: केंद्रीय मंत्र्यांचं धक्कादायक विधान; म्हणाले, 'उद्धव अन् राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट...'

माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी यावेळी ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचा उल्लेख थेट मास्टरमाईंड असा केला. ते म्हणाले, सुषमा अंधारे यांचा यात दोष नाही.त्यांनी माझ्यावर 277 केसेस असल्याचं सांगितलं. पण मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून अंधारे यांनी माझ्यावर आरोप केले असं म्हटलं. याचवेळी रामराजे यांच्याकडूनच आपली बदनामी होत आहे,असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना कोणत्याही रिपोर्टची गरज नव्हती. मी त्यांना मातीसाठी भेटलो, काही वैयक्तिक मागितले नसल्याचंही रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितलं. तसेच त्यांनी चॅलेंज दिलं म्हणून मी बोलत आहे. पण चॅलेंज कुणाला देताय? विधान परिषदेच्या आमदारामुळे या तालुक्याची बदनामी झाली. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते असा टोलाही त्यांनी रामराजेंसह विरोधकांना लगावला.

Ranjitsinha Nimbalkar ramraje nimbalkar sushma Andhare mehboob shaikh .jpg
Rohit Arya Case: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी मोठी अपडेट, माजी मंत्री केसरकरांच्या अडचणी वाढणार; पोलिस मोठं पाऊल उचलणार

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, माझा खून झाला असता तरी चाललं असतं, मला गोळी घातली असती तरी चाललं असत, पण किती बदनाम करायचं? मात्र,तरीही आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. फलटण तालुक्यातील 60 टक्के जनता आपल्यासोबत आहे असा दावाही यावेळी त्यांनी केला. या मास्टरमाईंडने मला लोकसभेत तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न केल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com