Lok Sabha Election 2024 : माढ्यात राजकीय हालचालींना वेग; शहाजीबापूंना घाम फोडणाऱ्या डॉ. अनिकेत देशमुखांनी घेतली पवारांची भेट

Madha Lok Sabha Constituency : धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, तीच भूमिका जयसिंह मोहिते पाटील यांची आहे. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे. मात्र, जयसिंह हे माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत आमचं ठरलंय, असे सांगत भाजपला इशारा देत आहेत.

Sharad Pawar-Dr. Aniket Deshmukh
Sharad Pawar-Dr. Aniket DeshmukhSarkarnama

Solapur, 07 April : माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आता वेगवान घडामोडी घडत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व तथा मागील विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी पाटील यांना घाम फोडणारे डॉ. अनिकेत देशमुख यांनी आज (ता. ०७ एप्रिल) सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने उमेदवारीमध्ये डावलल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Constituency ) बडे प्रस्थ मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झाले आहेत. मोहिते पाटील (Mohite Patil) यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. ते मतदारसंघात फिरतही आहेत. याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीची (NCP) उमेदवारी घ्यावी, यासाठी त्यांच्यावर समर्थकांकडून दबाव वाढत आहे.


Sharad Pawar-Dr. Aniket Deshmukh
Sanjay Raut News : महाजनांना जळगावमध्ये जागा दाखवणारच; भाजपच्या 'संकटमोचकां'ना राऊतांचं आव्हान

धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, तीच भूमिका जयसिंह मोहिते पाटील यांची आहे. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे. मात्र, जयसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत आमचं ठरलंय, असे सांगत भाजपला इशारा देत आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईत जाऊन धैर्यशील मोहिते पाटील हे भेटलही आहेत, मात्र, त्यांच्यात काय बोलणे झाले, याची माहिती मिळू शकली नसली तरी मोहिते पाटील कुटुंबातील सर्वांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे पवारांनी सांगितले असल्याची माहिती आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबत असल्याने मोहिते पाटील समर्थक अस्वस्थ आहेत. त्यातच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनीही माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मोहिते पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.


Sharad Pawar-Dr. Aniket Deshmukh
Supriya Sule News: बारामतीत हाय होल्टेज ड्रामा? सुळेंचे प्रचारप्रमुख प्रवीण माने अजित पवार गटात...

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षही माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहे. सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पवारांना भेटून केली आहे. दोन दिवसांपूर्वीच डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आज डॉ. अनिकेत यांनीही शरद पवार यांची बारामती येथे जाऊन गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले आहे.


Sharad Pawar-Dr. Aniket Deshmukh
Varun Sardesai News : '...तर आता वडील मुख्यमंत्री असताना तुम्ही खासदारकी का लढवता?' ; वरुण सरदेसाईंचा श्रीकांत शिंदेंना सवाल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com