11 Bombs Across Mumbai : 'RBI'ला धमकीचा ईमेल ; HDFC, ICICI कार्यालयांसह मुंबईतील 11 ठिकाणांचा उल्लेख!

Bomb Threat Emails to RBI : जाणून घ्या, दोन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करत नेमकी काय केली मागणी?
RBI Bomb Threat
RBI Bomb ThreatSarkarnama
Published on
Updated on

Mumbai RBI News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. मुंबईमधील 'आरबीआय'च्या कार्यालयासह एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचे ईमेलद्वारे कळवण्यात आले होते.

विशेष म्हणजे आरबीआय गर्व्हनर शशीकांत दास(Shashikant Das) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी दिल्या गेली होती.

RBI Bomb Threat
Kalyan Dombivli Politics News : दुजाभाव करू नका !; मनसे आमदाराने मुख्यमंत्री शिंदेंकडे अशी कोणती मागणी केली?

हा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित सर्व ठिकाणांची बारकाईने तपासणी केली गेली, परंतु काहीही आढळले नाही. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार ईमेल पाठवणाऱ्याने स्वत:ला 'खिलाफत इंडिया'चा असल्याचे म्हटले आहे. या ईमेलनुसार बॉम्बस्फोट मंगळवारी दुपारी होणार होते, परंतु तसे काही घडले नाही. मात्र पोलिसांकडून हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले असून, सर्वोतोपरी दक्षता बाळगली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

RBI Bomb Threat
Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री शिंदेंनी केलं लेकाचं कौतुक; कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com