Crime News : राजकीय वर्तुळात खळबळ! बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

NCP Corporator Molestation News : दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
NCP Corporator Molestation News
NCP Corporator Molestation Newssarkarnama
Published on
Updated on

Baramati News : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून राज्यभर महायुतीसह महाविकास आघाडीत चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान बारामतीत मात्र दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. किशोर आप्पासाहेब मासाळ असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.

मासाळ याच्यावर जबरदस्तीने घुसून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे असे आरोप ४५ वर्षीय पीडित महिलेकडून करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे मासाळ हा त्या पीडित महिलेवर उद्योजकांकडून खंडणी वसूल करायला लावण्यासाठी दबाव टाकत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत झाला असून पीडित महिलेच्या पती यांचे निधन झाले आहे. याचाच गैरफायदा किशोर मासाळ याने उचलल्याचे आता समोर येत आहे. मासाळ याने ओळखीचा गैरफायदा घेत संबंधित महिलेच्या घरात घुसून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

NCP Corporator Molestation News
Crime News : भीमातीर पुन्हा रक्तरंजीत! सीमाभाग हत्याकांडाने हादरला; जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या

तसेच विरोध करतानाच मासाळ याने, मी पुढारी असून तूला जगू देणार नाही, माझ्या खूप ओळखी आहेत. तूला खोट्या गुन्ह्यातही अडकवेन" अशी धमकी दिली. तसेच तुझे काही फोटो माझ्या मोबाईलमध्ये असून मी सांगेल तेच करावं लागेल, अन्यथा... असे म्हणत पीडित महिलेला वारंवार धमकी दिली. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील केल्याचा आरोप संबंधित पीडितेनं केला आहे.

NCP Corporator Molestation News
Pune Crime News: मोठी बातमी: विषारी दारूकांड प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील 3 वरिष्ठ अधिकारी सस्पेंड,नव्या अधिकाऱ्याची एन्ट्री

धक्कादायक म्हणजे मासाळ हा संबंधित पीडितेवर उद्योजकांकडे खंडणी मागण्यासाठी दबाव टाकत होता. जर उद्योजकांना ब्लॅकमेल कर, पैसे मिळवून दे अन्यथा मोबाईलमधील फोटो सोशल माध्यमावर व्हायरल करून बदनामी करेन अशी धमकी देखील मासाळ याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नगरसेवक किशोर मासाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com