Satara Maratha Andolan : मराठा समाजाने हे आरक्षण आंदाेलन हाती घेतले असून, मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही. हा महाराष्ट्र मराठ्यांचा असून, मराठ्यांच्या न्याय हक्काची ही लढाई आहे. महाराष्ट्रातील सरकार असाे अथवा दिल्लीतील सरकार असाे, मराठ्यांना न्याय हा द्यावाच लागेल, असे स्पष्ट मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
जरांगे पाटील Jarange Patil यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा Maratha Kranti Morcha आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनस्थळी आज सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी आपली भावना व्यक्त करून आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी आणि माझे कुटुंब आपल्या समवेत आहे. आमदार किंवा राजकीय भूमिका मांडण्यासाठी मी येथे आलेलो नाही. राजधानी सातारा येथील सकल मराठा समाजाच्या भावना समजून घेत त्या सरकारपर्यंत पाेचविण्यासाठी मी आलाे आहे. महाराष्ट्रात मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही. हा महाराष्ट्र मराठ्यांचा असून, सरकारला त्यांना न्याय द्यावाच लागेल.
ते म्हणाले, समाजापेक्षा मी माेठा नाही. समाजाच्या ताकतीमुळेच आम्ही आहाेत ही वस्तुस्थिती आहे. हे आंदाेलन आता समन्वयकांच्या हाती राहिलेले नाही. आता समाजानेच हे आंदाेलन हाती घेतले आहे. मराठ्यांच्या न्याय हक्काची ही लढाई आहे.
महाराष्ट्रातील सरकार असाे अथवा दिल्लीतील सरकार असाे मराठ्यांना न्याय हा द्यावाच लागेल. आमच्या घराण्यावर आपल्या सर्वांचे प्रेम आहे. मी असाे अथवा उदयनराजे असाे शिवछत्रपतींच्या घराण्यावर तुम्ही सर्वजण प्रेम करणारे आहात. Maharashtra Political News
त्यामुळे आमदारकी, खासदारकीपेक्षा तुमचे प्रेम महत्त्वाचे आहे. पदे येतात आणि जातात. या कायमच्या गाेष्टी नाहीत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यावरील तुमचे प्रेम, श्रद्धा कायम राहावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.