Sugar Factory Election :कल्याणराव काळेंची विजयी सलामी; पण सामना अटीतटीचाच, अभिजीत पाटलांच्या पॅनेलचे कडवे आव्हान

आता वीस जागांसाठी ४३ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Sahakar Shiromani Sugar Factory election
Sahakar Shiromani Sugar Factory electionSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी विजयी सलामी दिली आहे. संस्था मतदारसंघातून काळे यांच्या मातोश्री मालनबाई वसंतराव काळे यांची कारखान्यावर बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, जवळच्या सहकाऱ्यांनी सोडलेली साथ, विविध आरोप आणि पाटील-पवार, रोंगे पॅनेलने उभारलेले आव्हान पाहता काळे यांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसल्याचे चित्र आहे. (Unopposed election of Kalyanrao Kale's mother in Sahakar Shiromani Sugar Factory election)

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १९८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता वीस जागांसाठी ४३ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) गटाचे वीस आणि पाटील-पवार-रोंगे गटाचे वीस अशा चाळीस उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना होणार आहे.

Sahakar Shiromani Sugar Factory election
Congress Corporator Firing In Air: वाद मिटवायला गेलेल्या काँग्रेस नगरसेवकाच्या हॉटेल अन्‌ गाडीवर दगडफेक : नगरसेवकाचा हवेत गोळीबार

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) निवडणुकीसाठी (Election) २४२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 198 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे रिंगणात एकूण ४३ उमेदवार शिल्लक असून काळे व पाटील गटाचे प्रत्येकी २० उमेदवार आहेत. याशिवाय भंडीशेगाव, गादेगाव व सरकोली गटात प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळे व अभिजीत पाटील गटात सरळ लढत होत आहे.

Sahakar Shiromani Sugar Factory election
Baramati Loksabha : बारामतीत राजकीय हालचालींना वेग; केंद्रीय मंत्र्यांपाठोपाठ सुप्रिया सुळेही इंदापुरात, पाटलांच्या गावात जाणार

सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत पाटील गटाचे उमेदवार

भाळवणी- दीपक दामोदर पवार, विजय रघुनाथ भिंगारे, महादेव उत्तम देठे

भंडीशेगाव- बाबासाहेब शिवाजी काळे, बाळासाहेब सदाशिव कौलगे, बिभीषण दादाराव पवार

गादेगाव- सौदागर भानुदास गायकवाड, विलास शिवाजी पाटील, शिवाजी हनुमंत नागटिळक

कासेगाव- बब्रुवाहन पांडुरंग रोंगे, भारत विठ्ठल भुसे, महादेव निवृत्ती आसबे

सरकोली गट- निवास कृष्णा भोसले, दत्तात्रय रामा शिंदे, नंदा रामचंद्र मोरे.

इतर मागास प्रवर्ग- ज्ञानोबा रामचंद्र खरडकर

भटक्या विमुक्त जाती जमाती- रायाप्पा धोंडीबा हळणवर

महिला राखीव- अनिता नंदकुमार बागल, वैशाली पंकज लामकाने.

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग- सुनंदा राजाराम शिखरे.

सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार

भाळवणी गट-गोरख हरिबा जाधव (पळशी), युवराज छगन दगडे (करोळे), सुनील वामन सराटे (भाळवणी)

भंडीशेगाव- कल्याणराव वसंतराव काळे (वाडीकुरोली), परमेश्वर हरिदास लामकाने (पिराचीकुरोली), अमोल नवनाथ माने (नेमतवाडी)

गादेगाव- मोहन वसंत नागटिळक (कौठळी), दिनकर नारायण कदम (रोपळे), नागेश एकनाथ फाटे (गादेगाव)

कासेगाव- योगेश दगडू ताड (एकलासपूर), तानाजीराव उमराव ऊर्फ रावसाहेब सरदार (तावशी), जयसिंह बाळासाहेब देशमुख (कासेगांव)

सरकोली- आण्णा गोरख शिंदे (आंबे), संतोषकुमार शिवाजी भोसले (सरकोली), राजाराम खासेराव पाटील (खरसोळी)

संस्था मतदार संघ : मालनबाई वसंतराव काळे (बिनविरोध)

महिला राखीव - संगिता सुरेश देठे (धोंडेवाडी), उषाताई राजाराम माने (भंडीशेगांव)

अनुसुचित जाती जमाती- राजेंद्र भगवान शिंदे.

इतर मागास प्रवर्ग : अरुण नामदेव नलवडे.

भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग : भारत सोपान कोळेकर

Sahakar Shiromani Sugar Factory election
Padalkar On Sharad Pawar : पडळकर पुन्हा पवारांवर घसरले; एकेरी उल्लेख करत या वर्षी चौंडीत न येण्याचे कारण विचारले

विद्यमान नऊ संचालकांना डच्चू!

सत्ताधारी काळे गटाने या निवडणुकीमध्ये विद्यमान नऊ संचालकांना उमेदवारी नाकारली आहे. त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणराव काळे यांचे सहकारी असलेले कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मारुती भोसले आणि संचालक सुधाकर कवडे यांनाही उमेदवारी नाकारली आहे.

लवकरच निर्णय जाहीर करू : सुधाकर कवडे

उमेदवारी नाकारल्याने कल्याणराव काळे यांची कट्टर समर्थक असलेले सुधाकर कवडे व मारुती भोसले हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गावात कमी मतदार असल्याने आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही. गावातील कमी मतदारांना विश्वासात घेऊन लवकरच निर्णय जाहीर करू, असे सांगत सुधाकर कवडे यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com